ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मधुर बोला, मधुर वागा. केवळ तोंडाने नव्हे तर अंतःकरणापासून ! "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १, श्लोक - ३८ - ३९
हे जनार्दना, जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी वैर धरण्यामध्ये दोष दिसत नसला तरीसुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या पापाची जाण असताना आम्ही या पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे ?
माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
कान्हा ! प्रभू ! लोभाने ग्रासल्यामुळे दुष्कर्मांमध्ये फसलेल्या, पापाच्या मोठ्या खड्यात पडू पाहणाऱ्या, या पाप्याला तुझ्या पादारविंदांवर आणून टाक. पद्मनाभा! परमदयाळ ! पृथ्वी भक्षण करणाऱ्या परमज्योती ! परमपदनाथा! पापकर्मे भक्षण करणाऱ्या या पाप्यावर तुझी कृपादृष्टी ठेव. रक्षण कर. कान्हा ! कृपा कर. कृष्णा! किरीट ! गोपाळा! गोविंदा! तूच आधार. शरणो शरणम्.
कान्हा! निःशक्त करू पाहणाऱ्या मोठ्या पापापासून मला वाचव. क्षीराब्धी कान्हा! गरुडवाहना कान्हा ! याला सत्यचक्षू दे, ज्ञानचक्षु दे. नारायणा ! या श्वानाने फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला. स्वामी ! नित्य अनित्य विवेक दे. तूच आधार, प्रभू ! तुझ्या भक्ताला केवळ तुझे कर्म करायला लाव. तुझे गुणचिंतन करायला लाव.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा