गुरुवार, २७ मार्च, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

         " तुम्हाला परमेश्वरापासून दूर करणारी प्रत्येक गोष्ट माया आहे. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - २, श्लोक -९

 
          संजय म्हणाला, हे राजन! निद्रेला जिंकलेल्या अर्जुनाने ऋषिकेशला ' मी युद्ध करणार नाही' असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प बसला.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           हे कृष्णा! मला युद्ध करायचे नाही. मी एक अतिक्षुद्र जीव आहे. मला योग्य मार्ग दाखव. मला हात पाय नाहीत मी अपंग आहे. माझा स्वीकार कर आणि माझ्यावर कृपेचा वर्षाव कर. मी लुळापांगळा आहे. तुझ्याविना मी काहीही करू शकत नाही. तू मला तुझ्या छत्रछायेखाली घे. मला आसरा दे. शरणो शरणम्. तुझ्या चरणकमली स्वीकार कर. मला तुझा भक्त बनव. कान्हा, वासुदेवा, मला विवेक आणि वैराग्य प्रदान कर.
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा