ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रथम भाव निर्माण
होतात, त्यानंतर त्याचे विचार बनतात. त्यावर कृती करण्या अगोदर विवेकाचा
वापर करा. विचार करा, हे सत् कृत्य आहे का ? परमेश्वर प्राप्तीसाठी मला हे
सहाय्य करेल का ? "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - २, श्लोक - ८
जरी मला पृथ्वीवरील वैभवशाली राज्य वा सार्वभौमत्व प्राप्त झाले किंवा देवांचे स्वामित्व प्राप्त झाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल, असा उपाय मला दिसत नाही.
कर्माचे कोणतेही फळ असो माझ्या वडिलांप्रमाणेच मलाही ते नको असायचे.
कर्माचे कोणतेही फळ असो माझ्या वडिलांप्रमाणेच मलाही ते नको असायचे.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
हे प्रभू, तू माझे प्राप्तव्य आहेस. तरीही जर मला या सृष्टीतील वस्तूंची इच्छा असेल तर माझ्या इंद्रियांची भूक कधीच मिटणार नाही. देवाधिदेवा, हे कृष्णा, या जन्मात मला तुझी भक्ती दे. माझ्या मनाला सतत तुझाच विचार करण्याची बुद्धी दे.
आपल्या पंचंद्रियांची तृप्ती कधीही होत नसते हे माझ्या वडिलांनी यामधून दर्शवले आहे.
आपल्या पंचंद्रियांची तृप्ती कधीही होत नसते हे माझ्या वडिलांनी यामधून दर्शवले आहे.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा