गुरुवार, १३ मार्च, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

         " सर्वांना प्रेम द्या परंतु कोणत्याही एका व्यक्तीप्रती अधिक प्रेम प्रदर्शित करू नका."

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - ४१

 
          हे कृष्णा ! कुळामध्ये जेव्हा पापाचे प्राबल्य वाढते तेव्हा कुळातील स्त्रिया पतित होतात आणि या स्त्रियांच्या पतनामुळे हे वार्ष्णेया, वृष्णीवंशजा! अवांछित वर्णसंकर संतती उत्पन्न होते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           हे वैकुंठवासा, जर स्त्रियांमध्ये नीतीमत्ता नसेल तर सर्व जातीच अनैतिक व दुराचारी बनतात. माधवा, या मूर्खाला एकपत्नीव्रती  कर. तुझा अनन्य भक्त बनव. मला सन्मार्गावरून ढळू देऊ नकोस. आदिनारायणा, मला तुझा दास बनव. हे हरितवर्णा! अच्युता! तू करुणेचा स्रोत आहेस. माझ्यावर दयेचा वर्षाव कर. कान्हा, माझ्या आधारा,शरणो शरणम्.
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा