गुरुवार, २० मार्च, २०२५

 


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

" परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी प्रेम हा मार्ग आहे. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक -४७

 
          संजय म्हणाला, रणांगणावर दुःखाने उद्विग्र झालेला अर्जुन एवढे बोलून धनुष्यबाण खाली टाकून रथाच्या मागील भागात जाऊन बसला.

          हा श्लोक वाचल्यानंतर------
          माझ्या वडिलांनी सांगितले की ते जिथे दृष्टी फिरवतील तिथे सर्वत्र अंधःकार होता. त्यांना मार्गही माहित नव्हता. त्यांनी वामनाला भगवंताच्या चरणकमलांशी घेऊन जाण्याची विनंती केली. अर्जुनाच्या बाबतीत जे घडले ते सर्व त्यांच्या बाबतीत घडते आहे असे त्यांना वाटले. जर आपण माझ्या वडिलांचे आणि अर्जुनाचे शब्द यांची तुलना केली तर ते स्वतःच अर्जुन बनल्याचे आपल्याला आढळेल. अशा तऱ्हेने ते गीतेतील प्रत्येक श्लोक वाचत व स्वतःच अर्जुन बनत. ते अर्जुनाप्रमाणे अश्रू ढाळत. हे दर्शवणारी एक गोष्ट पुढे देत आहे.

           कुलशेखर आळ्वार हा एक महान राजा होऊन गेला. त्याच्या दरबारात एक धर्मगुरू रामायणाचे वाचन व कीर्तन करीत. एक दिवस त्या धर्मगुरूंनी राम रावण युद्धाचा प्रसंग सांगण्यात सुरुवात केली. ते ऐकताक्षणीच त्या राजाने मंत्र्यांना बोलावून आपले सैन्य युद्धासाठी सज्ज करण्यास सांगितले. त्या कथेशी एकरूप झालेला राजा आपले सैन्य घेऊन रामेश्वर येथे गेला व तेथून तो लंकेत जाण्याच्या तयारीत होता. सर्वांनी त्याला वास्तवाचे भान करून दिले. कथा ऐकताना, कथेतील सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर जिवंत झाले. राम आणि रावण युद्ध साठी सज्ज झालेले त्याला दिसत होते. त्याचप्रमाणे माझे वडील अर्जुनाचे शब्द वाचून त्याच्या भावभावनांशी तन्मय झाले तद्रूप झाले. त्यांनी साश्रू नयनांनी त्यांचे त्रिविध ताप नष्ट करण्यासाठी परमेश्वराकडे विनवण्या केल्या. हे आहे ' यद् भावम् तद् भवति '  ते  जो श्लोक वाचत त्याचा भावानुभव घेत.
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा