ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" सर्वांना प्रेम द्या परंतु कोणत्याही एका व्यक्तीप्रती अधिक प्रेम प्रदर्शित करू नका."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १, श्लोक - ४०
हे कृष्णा कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात पापाचे प्राबल्य वाढते.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
कान्हा या अतिक्षुद्र जीवाचा बेडा पार कर. कुळ व कुळधर्म नष्ट होईल अशी मला आशंका वाटत आहे. प्रभू, ही भीती निरर्थक आहे याची मला जाणीव करून दे. हे आदिपुरुषा मला सदैव तुझ्यावरच विसंबून राहू दे. आधी अंत ज्योती, आपतबांधवा, अच्युता, हरितवर्णा, तू माझा आश्रय.शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा