रविवार, १६ मार्च, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

" जसे भाव तसे जीवन. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक -४२

 
          वर्णसंकर हा कुळघातक्यांना आणि कुळाला नरकाप्रत घेऊन जातो कारण श्राद्ध आणि जलतपर्ण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           कान्हा, प्रभू, का याला गोंधळात ढकलत आहेस? भक्तांना सुलभ प्राप्त होणाऱ्या, अच्युता!  दीनाला तुझ्या चरणी घेऊन उद्धार कर. पितरांना पिंडदान व पाणी देईल असे कर. पूर्वजांच्या पूर्वजा, या भोग्याच्या चुका पोटात घाल. वेणूगोपाला ! वासुदेवा! या दासाची वृद्धी कर. तुझ्या भक्ताला तुझाच विचार करत असता मृत्यू दे. सर्वेशा!
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा