ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" सर्वांना प्रेम द्या परंतु कोणत्याही एका व्यक्तीप्रती अधिक प्रेम प्रदर्शित करू नका. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १, श्लोक - ३७
हे माधवा, या धृतराष्ट्रपुत्रांची, आमच्या बांधवांची हत्या करण्याचे पाप कर्म आम्ही करणे योग्य नाही. आमच्याच नातलगांना मारून आम्ही कसे सुखी होऊ?
माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
कान्हा, या मूर्खाची संसारात बुद्धी भ्रष्ट झालीय. आप्तस्वकीयांत गुरफटून त्यांना सोडायचे मन होत नाहीये. यशोदेला मुखात विश्वदर्शन देणाऱ्या! तीन पावलात विश्व व्यापणाऱ्या! पांडवांचा दूत होणाऱ्या! खांबामधून प्रकटणाऱ्या! दीनदुबळ्या जणांचे दुःख निवारण करणाऱ्या! कान्हा माझी काळजी दूर कर. सर्वसंगपरित्याग करून तुझे चरणकमळ धरून जगू दे. वासुदेवा! वैकुंठवासा! रामा! कान्हा! कान्हा! तुझाच आधार. शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा