ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १५ , श्लोक १७
या दोघांव्यतिरिक्त एक परमपुरुष आहे त्याला परमात्मा म्हटले जाते. तो अविनाशी पुरुष तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
कान्हा, तू अविनाशी आहेस. या नाशवंताच्या देहामध्ये प्रवेश कर आणि त्याची पोषण कर. तुझ्या दयेला अंत ना पार. हे करुणामूर्ती कमलनयना तू माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्. या पाप्याला पावन बनव आणि तुझ्या दिव्य चरणांशी घेऊन जा. हे जगद् रक्षका, त्रिलोकनाथा, त्रिमूर्तींच्या प्रमुखा, श्रीमन् नारायणा, तू मला आश्रय दे. मी तुला शरण आलो आहे.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा