ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १५ , श्लोक १८
मी च्युत आणि अच्युत यांच्याही (अतीत) पलीकडे, दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये आणि वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
कान्हा, तू पुरुषोत्तम आहेस. तू ब्रम्हांडातील चराचर दाखवणारा आहेस. सर्व जगात आणि वेद तुझा महिमा गातात. त्रिपाद वामना! मला तुझे दर्शन दे. मला तुझ्या चरणांशी घेऊन आशीर्वादित कर. तू माझ्यामध्ये भरून राहा आणि मला तुझ्या मध्ये सामावून घे. हे प्रभू, आदिनारायणा, परब्रम्हा, या पाप्याला तुझ्या चरणांशी घेऊन दुवा दे.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा