रविवार, १९ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             स्वामींनी १९९८ मध्ये माझ्या उदरात विश्व ठेवले. मी मातृभावामुळे विश्वपरिवर्तन घडविले. कलियुगात या भूतलावर खरा आनंद कुणालाही माहित नाही. फसव्या आनंदाच्या शोधा ते इकडून तिकडे भरकटत आहेत. सर्व जन्ममृत्यूच्या चक्रात अडकले आहेत. खरे तर निखळ आनंद केवळ परमेश्वरापासून प्राप्त होऊ शकतो.

             'मी व माझे' यावरील ममत्वाचा त्याग केला तरच निखळ आनंद निर्माण होतो. जगास याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी मी इथे आले. जागतिक कर्मे स्वीकारून मी यातना भोगत आहे. हे माझ्या मातृभावामुळे साध्य होते. स्वामींनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा