ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
इथे माझी पृथ्वीवरील अवतरण सूचित केले आहे. पूर्वी एकदा स्वामी म्हणाली की कलियुगाच्या लोकांचे रुदन ऐकून व त्यांच्या यातना पाहून महालक्ष्मी धरतीवर अवतरली. मी अशी अवतरले. मी कलियुग तोडून प्रकृतीचे विधीलिखित बदलण्यासाठी आले. कलीचा कायदा म्हणजे कर्मकायदा. हा कायदा तोडून मी प्रकृतीचा अधःपात थांबविते. हा विनाश प्रकृतीचे विधीलिखित आहे मी स्वामींपासून नियुक्त झाल्यामुळे, माझ्यापाशी असलेल्या सर्व शक्तीनिशी मी हे करते. "त्या"ने मला वेगळ्या रूपात आणले मी "त्या"ची शक्ती आहे.
स्वामी व मी इथे आलो. कलियुगाला मुक्त करण्यासाठी अखिल विश्वाची कर्मे आमच्या देहांवर घेतली. या आपत्काली मृत्यूघटकेच्या वेळी मी अश्वत्थ वृक्ष परत विश्वात आणून पृथ्वीवर- मानवी मातीवर त्याचे आरोपण करते. या जगात मी स्वामींना परत आणि असा याचा अर्थ आहे. "त्या"च्या संसार वृक्षाचे पृथ्वीवर रोपण झाले. मी पृथ्वीचे वैकुंठात परिवर्तन करते, तिला स्वर्गाची शाखा करते. प्रकृती सर्वांना मुक्ती बहाल करते. ती स्वतः झेप घेऊन मानवाला अमृतवाकडे घेऊन जाईल.
संदर्भ - सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा