गुरुवार, २३ एप्रिल, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            लहानपणापासून मला कृष्णाची विवाह करायचा होता. आता ६३ व्या वर्षी माझे नातेवाईक माझी मुले आणि पती या सर्वांनी मला साईकृष्णाला देऊन टाकले. ही घटना मी विसरू शकत नाही खरोखर एक अजब चमत्कार! केवळ परमेश्वरालाच त्याच्या लीला ठाऊक! स्वामींनी कसे मला सर्व बंधना मधून मुक्त केले व केवळ त्यांचाच एक बंधन आहे हे दर्शविले. हा काही संन्यास समारंभ नसून विवाह समारंभ आहे! तरुण असताना मी स्वतः अंडाळ असल्याची कल्पना करून मी तिच्या ' वारनम अयिराम ' . हा श्लोक पुन्हा पुन्हा गाऊन आनंद घेत असे. ह्या श्लोकामध्ये श्रीकृष्णाशी झालेल्या तिच्या स्वप्न विवाहाचे वर्णन करते. आज हे सत्यात उतरले आहे. अखिल विश्व या विवाह समारंभाचे साक्षी आहे. " यद् भावम् तद् भवति " तुम्ही ज्याचा विचार करता ते बनता. मी कथिलेला कृष्णाची विवाहाचा प्रसंग आता वास्तवात उतरला आहे वा वास्तव बनला आहे. मी ४० वर्षे गृहस्थाश्रमी संन्यासी होऊन जीवन जगले. आता संन्यासी बनून मी कृष्णाबरोबर गृहस्थ जीवन जगत आहे! ज्या चमत्काराने माझी मनोकामना पूर्ण केली त्या चमत्काराचे कोणालाही आकलन होणार नाही.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा