गुरुवार, २३ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             सत्यवान- सावित्रीची गोष्ट सर्वांना माहीत आहे. तरीही महान संत अरविंदांचे लिखाण वेगळे आहे. ते दुसरी कथा सांगत होते. ते त्रिकाळ ज्ञानी आहेत. त्यांना भूतकाळ, वर्तमान व भविष्याचे ज्ञान आहे. ते त्या सत्यवानसंबंधी लिहीत नव्हते; तर भविष्यात होणारा अवतार भगवान श्री सत्यसाईबाबांबद्दल लिहीत होते. त्यांनी अवतार व त्याची शक्ती, यांच्या अवतार कार्याबाबत लिहिले. स्वामींचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ ला झाला. दुसऱ्या दिवशी २४ नोव्हेंबर, १९२६ ला अरविंद यांनी घोषित केले, "आज कृष्ण स्थूल रूपात अवतरला." या घोषणेनंतर ते एकांतात गेले व क्वचितच दृष्टीस पडले.
             अशारीतीने स्वामींनी सावित्री पुस्तकातील पुष्कळ भाग अधोरेखित केले व मला माझ्या जीवनाशी त्या भागांची तुलना करावयास सांगितले. आता आपण पाणी १०६ पाहू.
             .....तुझ्या अंतरंगातील धगधगणाऱ्या मार्गदर्शकाशिवाय इतर कोणाची तुला गरज नाही. तुझा होऊ घातलेला जीवनसाथी व सोबती तुझी वाट पाहत आहे.




संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा