ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
प्रकरण - २
कुमारी पासून कुबेरापर्यंत
प्रथम गणेश होम, नवग्रह होऊन आणि लक्ष्मीनारायण सुदर्शन होऊन झाले. अखेरी संन्यास होऊन करण्यात आला. ह्या होमाच्या अगोदर माझे मंगळसूत्र काढले व ते फुले फळे व इतर पूजा साहित्य बरोबर एका तबकात ठेवण्यात आले. त्यानंतर ते माझ्या यजमानांनी दुर्गा देवीच्या चरणी अर्पण केले. इथून पुढे त्यांना माझे यजमान म्हणणे उचित ठरणार नाही. आता माझी आणि त्यांचे नाते मित्रत्वाचे आहे. असा मित्र जो परमेश्वराचे कार्य करण्यासाठी मला सहाय्य करतो. श्री मनोहरननी स्वतःच्या हातानी मी काढलेले मंगळसूत्र दुर्गा देवीच्या चरणी अर्पण केलेले पाहून सर्वांचे डोळे पाणावले. माझ्या आयुष्यात अशी घटना घडेल असे कोणालाही वाटले नव्हते. स्वामी म्हणाले की अशी घटना कोणाच्याही जीवनात घडलेली नाही. कोणतीही स्त्री आपले मंगळसूत्र काढण्यास व आपल्या पतीकडून ते परमेश्वरास अर्पण करण्यास राजी होणार नाही. मी दीर्घकाळ गृहस्थाश्रमात असूनही संन्यासी होते व आता मी पूर्णपणे शास्त्रसंमत संन्यासी आहे. मंगळसूत्र काढण्याच्या घटनेने मला रामकृष्ण परमहंस आणि पवित्र धागा तोडल्याची आठवण करून दिली. पवित्र अग्नीमध्ये पूर्ण होती देताना मी म्हणाले, "भगवान आम्ही आमचे जीवन आपणास समर्पित करतो."
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा