गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " जीवन कसे जगावे ? हे आपल्या हातात आहे. परमेश्वराच्या नव्हे."

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभवज्ञान

              विश्वामित्र नाडी, जी कौशिक नाडी म्हणूनही ओळखली जाते त्यामध्ये माझ्या प्रेमाचे वर्णन ' आगळे -वेगळे प्रेम ' असे केले आहे . मी स्वामींना विचारले की , या प्रेमात आगळे वेगळे असे काय आहे ? स्वामींनी मला एक दृश्य दाखवले. 
         दृश्य 
         स्वामी म्हणतात,
" तू विचारतेस,
' या प्रेमाचे आगळे-वेगळेपण कशात आहे ?'
हे प्रेम वर्णनातीत आहे. 
जर कोणी त्याचे  वर्णन करावे 
तर ते त्याला ज्ञात नाही 
जर ते त्याला ज्ञात असेल 
तर ते वर्णनातीत आहे. 
जर त्याला प्रेम- ज्योती म्हणावे 
तर ते रूपात बद्ध होते 
जर त्याला प्रेमाचा महासागर म्हणावे 
तर त्याला किनारा आहे. 
जर त्याला प्रेमाचे अंतरीक्ष म्हणावे 
तर ते नामात बद्ध होते. 
मग याचे वर्णन करावे तरी कसे ?
कौशिक ऋषींनी काय पाहिले?
काय जाणिले ?
त्यांनी त्या प्रेमा कसे संबोधले ?
गरुडा ! कौशिकास तू घेवोनी ये. 
कौशिका ! हिच्या प्रेमाचे आगळे -वेगळेपण आहे कशात ?
कौशिक म्हणतात ..... 
" स्वामी, दूरवरून मी एक छोटासा ठिपका पाहिला. 
प्रभू, कृपया क्षमा करा मज,
चूक झाली माझी 
हे प्रेम शब्दात वर्णू शकत नाही  मी 
म्हणून मी म्हटले 'आगळे वेगळे '
तुम्ही प्रेमधार आहात 
स्वामी म्हणतात,
" विश्वामित्रा, जर तुम्ही विश्वाचे मित्र नसता 
तर तुम्हाला तो ठिपकाही दिसला नसता 
विश्वाचे मित्र तुम्ही म्हणून तो ठिपका दिसला तुम्हा. 
तो ठिपका व ब्रम्ह दोन्ही सारखेच ! वर्णनातील. 
तुम्ही पाहिलेल्या ठिपक्याविषयी सांगा जगाला."
(त्यानंतर स्वामी माझ्याकडे पाहत म्हणतात.)
" हे प्रियतमे, तू पाहिलेस का ?
मी तुझ्या प्रेमाचा आधार 
आधार, अधेय, अवतार, आचार. 
सर्व काही प्रेम आहे. 
या प्रेमाच्या आधारास. 
तुझे प्रेम जाणून घेण्या 
सहस्त्रजन्म हवेत घ्याया 
आपण एक काम करू 
दे तुझे संपूर्ण प्रेम तू मला 
आणि सत्य घे माझे,
होऊन प्रेमसाई मी 
घेईन अनुभूती तव प्रेमाची 
तदनंतर विशद करू शकेन मी 
प्रेम होऊनी विस्तारेन मी अखिल विश्वात 
अनुभव घेण्या प्रविष्ट होईन प्रत्येकात 
तदनंतर सांगेन मी प्रेम काय चीज आहे 
कौशिकाने अचूक सांगितले ' आगळेवेगळे '!
नाम देणे शक्य नाही, या आगळ्या वेगळ्या प्रेमास. 
ना आदि ना अंत ' या प्रेमास '."

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

       " जर तुम्ही प्रत्येक गोष्ट परमेश्वराशी जोडली तर तुम्ही परमेश्वरच होवून जाल. "  

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभवज्ञान 

            पृथ्वी कर्मभूमी आहे. कर्म करण्यासाठी आपण इथे जन्म घेतो. जर आपण कर्माचा योग बनवला तर कुठलेही बंधन आपल्यावर परिणाम करू शकत नाही व आपल्याला जखडूही शकत नाही. माझे संपूर्ण जीवन कर्मयोग असल्यामुळे ज्या पांडुरंगाने रुक्मिणीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले त्याच्या बरोबर मी ७० वर्षे जीवन व्यतीत करणार आहे. प्रत्येक क्षणी पांडुरंग माझ्या बरोबर असेल आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. 
            माझा ज्यांच्याशी विवाह झाला त्यांचे खरे स्वरूप मला ज्ञात नव्हते. त्या रूपात स्वामीच आल्याचे सत्य स्वामींनी उघड केले. गोरा कुंभाराबरोबर पांडुरंग त्याच्या भावाच्या रूपात वावरला. एकनाथांबरोबर १२ वर्षे पाणक्याच्या रूपात वावरला. त्याचप्रमणारे माझ्याबरोबर पांडुरंग माझ्या पतीच्या रूपाने वावरला. 
            त्या भक्तांना, ते परमेश्वरासोबत राहात असल्याचे ज्ञात नव्हते, त्यांना ते अखेरच्या काळात उमजले. त्याचप्रमाने मीही  कोणाबरोबर जीवन जगले हे मला माहीत नव्हते. हे सर्व स्वामींनीच मला  सांगितले. 
            ज्यांनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, त्यांच्याविषयी मी अनभिज्ञ होते. माझा कृष्णाशी विवाह झाला होता. मी पांडुरंगाबरोबर जीवन जगले आणि सरतेशेवटी माझा रंगनाथाशी योग होईल. स्वामींनी हे सिद्ध केले की, कृष्ण, पांडुरंग आणि रंगनाथही तेच आहेत.

*    *    *

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

        " भौतिक कल्पना आणि ज्ञान तोडून प्रत्येक गोष्ट दिव्य ज्ञानाशी जोडल्यास तुम्हाला परमेश्वराच्या वैश्विक रूपाचे दर्शन होईल."

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभवज्ञान 

            स्वामींनी यासाठी पांडुरंगाचे मंदिरच का निवडले ? त्याऐवजी त्यांनी रंगनाथाचे वा कृष्णाचे मंदिर का नाही निवडले ? कारण जीवन केवळ कर्म करण्यासाठी आहे. जर आपण सर्व कर्मं कर्मयोग समजून केली तर ती आपल्याला बाधत नाहीत. 
            मी माझे प्रत्येक कर्म कर्मयोग समजून करते, त्यामुळे मी पुढील जन्मात फक्त परमेश्वरासमवेत राहणार आहे. पुढील जन्मातील सर्व कार्ये आम्ही एकत्रच करू. जगापुढे आदर्श जीवनशैलीचे उदाहरण मांडण्यासाठी हे सर्व घडले. " पांडुरंगाने आजवर अनेक भक्तांसाठी जे केले तसे पांडुरंग माझ्यासाठी काही करणार नाही का ?" ही आस माझ्या मनात सतत असते. ' साई गीता प्रवचनम ' या पुस्तकातील ' कर्मयोग ' प्रकरणात मी याविषयी सविस्तर लिहिले आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" तुमचे भाव तुम्हाला जन्म, नाम आणि रूप देतात."

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभवज्ञान

विवाह - कृष्णाबरोबर 
योग - रंगनाथाशी 
जीवन - पांडुरंगाबरोबर 
              या सर्वांमधून स्वामींचे रूप साकारले. 
              स्वामींनी रुक्मिणीच्या गळयात मंगळसूत्र का बांधले ? भक्तविजयमध्ये गोरा कुंभाराची गोष्ट आहे. त्यामध्ये पांडुरंग त्याच्या भावाच्या रूपात येऊन त्याला मडकी बनवायला आणि विकायला मदत करतो. सखूबाईसाठी तो जात्यावर पीठ दळतो, भांडी घासतो आणि तिचे सर्व घरकाम करतो. एकनाथाघरी तो अन्न शिजवतो, पाणी भरतो. अशा प्रकारे परमेश्वर त्याच्या भक्तांना मदत करतो. तो हे सर्व कर्मयोगाद्वारे करतो. 
              माझ्यासाठीही पांडुरंग असाच एक दिवस येईल आणि मला मदत करेल, असे मला नेहमी वाटत असे. रोज मी त्याची आतुरतेने वाट पाहात असे. आता स्वामी रंगराजा म्हणून येतील आणि माझ्याबरोबर राहतील. प्रत्येक गोष्ट आम्ही दोघे मिळून करू. स्वामी माझ्या सर्व इच्छा पुऱ्या करतील. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

 सुविचार 

" सर्वकाही परमेश्वर आहे असे मानून आपण आपल्या प्रेमाची कक्षा रुंदावली पाहिजे."

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभवज्ञान 

            मी लहानपणी माझी आजी, पणजी, वडील काका, काकू यांच्याकडून पांडुरंगाच्या गोष्टी ऐकल्या. मी त्यांना त्या पुन्हा पुन्हा वाचायला सांगायचे ! मोठी झाल्यावर मी स्वतःच त्या गोष्टी वाचू लागले. 
            गोष्टी वाचून मलाही वाटे की, गोष्टीतल्यासारखे पांडुरंगाने येऊन मलाही मदत करावी. मी पांडुरंगाला आर्ततेने पुकारत असे, " पांडुरंगा, पांडुरंगा." 
            मला कृष्णाशी विवाह करायचा होता. आंडाळसारखे मला रंगनाथामध्ये सदेह विलीन व्हायचे होते. त्यानंतर कृष्णाने मला सांगितले," मीच सत्यसाईच्या रूपाने अवतरलो आहे." त्यानंतर मी स्वामींवर माझ्या उत्कट प्रेमाची उधळण करू लागले. स्वामींनी मला माझ्या मंगळसूत्राचा त्याग करण्यास सांगितले. नंतर त्यांनी आशीर्वदित केलेले मंगळसूत्र मी घातले. वसिष्ठ गुहेमध्ये माझा त्यांच्याशी योग्य झाला. 
           त्यानंतर, माझा ज्यांच्याशी विवाह झाला होता, तेही स्वामींचेच रूप असल्याचे स्वामींनी उघड केले. अखेरीस माझा देह स्वामींमध्ये विलीन होईल. आम्ही पुन्हा भूतलावर येऊ आणि आमचा विवाह संपन्न होईल. ते रंगराजा म्हणून येतील तर मी प्रेमा. पुढील जन्मात स्वामी माझी हरएक इच्छा पुरी करतील. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, २६ जानेवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

         " प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आहे. अशी कोणतीही जागा नाही जेथे तो नाही. "

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभवज्ञान 

              पंढरपूरमध्ये स्वामींनी रखुमाईच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श केल्यावर माझ्या हृदयाच्या गाभ्यातून उमटलेले भाव या सर्वांस कारणीभूत आहेत. सत्ययुगाच्या आगमनासाठी हे भावच कारणीभूत आहे. हा बंधच मी लिहित असलेल्या प्रत्येक प्रकरणास, प्रत्येक पुस्तकास कारणीभूत आहे. ही घटना या सर्वांचा पाया आहे. माझे आणि स्वामींचे नाते दर्शवणारा हा सबळ पुरावा आहे. 
             ध्यानामध्ये स्वामी म्हणाले,
              " लहानपणापासूनच तू ' भक्तविजय ' मधील पांडुरंगाच्या कथा ऐकल्याआहेस. पांडुरंग जसा अनेक भक्तांच्या मदतीला धावून आला तसा तो तुझ्याही मदतीला धावून यावा असे तुला वाटत असे. तुला कृष्णाशी विवाह करायचा होता. आंडाळप्रमाणे तुला रंगनाथामध्ये सदेह विलीन व्हायचे होते. त्यांनतर कृष्णाने तुला सांगितले की, तोच पुन्हा सत्यसाई बनून आला आहे. त्यांनतर तू माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागलीस. मी तुला सांगितले की, मी पुढील अवतारात रंगराज बनून येईन. यावरून हे सिद्ध होते की, मीच तो रंगनाथ आहे, पांडुरंग आहे. तुला मंगळसूत्र दिले, रुक्मिणीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले, यातून हे सिद्ध केले. 
ध्यानसमाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम       

गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
पुष्प पंचवीस 
त्याग भाव 



न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनौके अमृतत्व मानुशः 

           संतती कर्म वा धन ह्याद्वारे अमृतत्व प्राप्त होऊ शकत नाही ते  केवळ त्यागाद्वारे प्राप्त होते. जर मनुष्याला अमृतत्व प्राप्त करण्याची इच्छा असेल तर त्याने सर्वस्वाचा परित्याग केला पाहिजे असे वेदांमध्ये घोषित केले आहे. 
           कठोपनिषदात विश्वजीत यज्ञाविषयी असे म्हटले आहे जर एखाद्याला सर्व प्राप्त करायचे असेल तर प्रथम त्याने सर्वस्व त्यागले पाहिजे. ' सर्व प्राप्त ' म्हणजे काय ? त्याचा अर्थ मुक्ती. मुक्ती म्हणजे सर्वस्व. अमरत्व प्राप्त करण्यासाठी सर्व काही सोडून दिले पाहिजे. 
           जेव्हा आपण एखाद्याला आपली मौल्यवान वस्तू दुसऱ्याला भेट देतो तेव्हा त्यातून आपल्याला केवढा आनंद मिळतो. मुलांच्या कल्याणासाठी आईने अंगावर घेतलेली त्यांची दुःख ! जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याची दुःख, त्रास आपल्यावर घेतो तेव्हा त्या व्यक्तीला मिळणारा आनंद व समाधान वेगळेच असते व पूर्वी कधीही न अनुभवलेले असते. 
           छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करा आणि पाहा तुम्हाला त्यातून केवढा आंनद मिळतो.
           धन, पद, प्रतिष्ठा, लोकप्रियता, कुटुंब, नावलौकिक, नातीगोती हे सर्व क्षणभंगुर आहे, अशाश्वत आहे. ह्या जगामध्ये केवळ त्याग शाश्वत आहे कारण तो आपल्याला शाश्वत अवस्था प्रदान करतो. केवळ त्यागाद्वारे आपल्याला अमरत्व प्राप्त होते. त्यागाद्वारेच आपल्याला परमेश्वरप्राप्ती होते. श्रीकृष्णाने भगवद्  गीतेतील १२ व्या अध्यायातील १२ व्या श्लोकात हेच सांगितले आहे. 
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाध्द्यानं विशिष्यते |
ध्यानात्कर्मफलत्यागसत्यागाच्छान्तिरनन्तरम || 

             मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण त्यागाने त्वरित परमशांती मिळते. 
           त्यागभाव कसा उत्पन्न होतो ? 
           केवळ वैराग्याने त्यागभाव उत्पन्न होतो मनुष्याची वैराग्य वृत्ती असायला हवी. केवळ परमेश्वर सत्य आहे आणि बाकी मिथ्या ह्या भावामध्ये जो दृढतेने स्थित आहे त्याच्या मनामध्ये आपोआपच वैराग्य भाव येतो आपण स्वतःला मायेमधून मुक्त केले पाहिजे. सर्वस्व त्यागले पाहिजे. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' The Principle of Becoming God ' ह्या पुस्तकातून. 


जय साईराम