गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

             " आपण केवळ ह्या परमेश्वराच्या निर्मितीचे विश्वस्त आहोत. आपण कोणत्याही गोष्टीचे मालक नाही. "

चिन्नकथा

शुचिता, ऐक्य, दिव्यत्व 

                    एका गावाच्या हद्दीला लागून एक छोटासा ओढा होता. त्याच्या काठावर एक पांढरा बगळा राहत होता. एक दिवस, तो एका पायावर उभा असताना दोन छोटे मासे पोहत तेथे आले. त्यांन पाहून बगळ्याने विचार केला," ह्या छोट्या माशांना सोडून देऊन मोठ्या माशांची प्रतिक्षा करावी." त्या दोन छोट्या माशांची नजर बगळ्यावर पडताच ते घाबरून गेले. परंतु त्याच्या तावडीतून सुटल्यानंतर ते आनंदाने परत मागे फिरले. परत जाताना त्यांना समोरून एक मोठा मासा येताना दिसला. त्यांनी त्याला सांगितले, " ओढ्याच्या काठाला जाऊ नकोस. तेथे एक बगळा वाट पाहात आहे. जर त्यानी तुला पाहिले तर तो तुला खाऊन टाकेल ! मोठा मासा म्हणाला, " ठीक आहे मी तुमच्या बरोबर येतो. " ते सर्वजण एकत्र पोहू लागले. थोड्या वेळाने तेथे अजून दोन मोठे मासे आले. त्या माशांनी त्यांना बगळ्याविषयी सांगितले. अशा तऱ्हेने त्यांनी बगळ्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व माशांना रोखले. ते सर्वजण बगळ्याच्या विरुद्ध दिशेने पोहू लागले. तो बिचारा बगळा वाट पहात बसला परंतु एकही मासा  त्याच्या दृष्टीस पडला नाही. 
                 त्या माशांसारखे आपण सर्वांमध्ये ऐक्य आणि परस्परांविषयी प्रेम असायला हवे. म्हणजे कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी आपण सक्षम होऊ. माशांनी अत्यंत प्रेमाने आणि द्वेषभाव न ठेवता आपल्या बांधवांना येऊन ठेपलेल्या संकटांविषयी सूचना दिल्या. ते एकत्र राहिले त्यामुळे त्यांची मृत्युपासून सुटका झाली. ह्या माशांसारखे सर्वांनी एकमेकावर प्रेम करून एकमेकांना मदत केली पाहिजे. सर्वांनी एकोप्याने राहिले तर सर्वांची मृत्युच्या कराल दाढेतून सुटका होईल. जन्ममृत्युचे मुलभूत कारण असलेली द्वेषभावना तेथे नसेल. द्वेषभावनेचा अभाव म्हणजेच शुचिता होय. शुचिता आणि ऐक्य यांचा संयोग म्हणजे दिव्यत्व होय. एकमेकांवर प्रेम करणे म्हणजेच ऐक्य. शुचिता आणि ऐक्य या दोन्हीचा संगम याचा अर्थ दिव्यत्व. यांद्वारे जीवनातील कोणत्याही आपत्तीचा आपण सामना करू शकतो. 

व्ही. एस.


संदर्भग्रंथ :-  DIVINE STORIES 
                   and parables 
 
जय साईराम

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " जेव्हा समस्वभावी लोक एकाच ध्येयासाठी प्रार्थना करतात तेव्हा त्यांचे ध्येय साध्य होते."

चिन्नकथा

आज ज्याची उपेक्षा केलीत तेच उद्या पूजनीय ठरेल

                   एक मनुष्य रस्त्याने चालला होता. चालता चालता त्याच्या वाटेत एक मोठा पाषाण आला. त्याने त्याच्यावर पाय देऊन तो पाषाण जोरात दूर भिरकावला. थोड्या वेळाने दुसरा एक मनुष्य तेथून जात होता. त्यानेही तो पाषाण पाहिला. तो तेथे थांबून त्या पाषाणाचे निरीक्षण करू लागला. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने तो पाषाण घरी आणला. छिन्नी हाथोडा हातात घेऊन तो त्या पाषाणातून शिल्पकृती निर्माण करू लागला. पाहता पाहता त्या पाषाणातून कृष्णाची सुंदर मूर्ती साकारली. ती मूर्ती घडवण्यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. अखेरीस कार्य पूर्ण झाले. त्याच्या शेजारी एक पुजारी राहत होते. ती मूर्ती पाहून ते त्याला म्हणाले, " अत्यंत सुंदर मूर्ती आहे ही ! आपण ही मूर्ती मंदिरात ठेवू या. " त्यानंतर त्या मूर्तीची मंदिरामध्ये विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. ती सुंदर कृष्ण मूर्ती मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांच्या मनाला भावली. ते त्या मूर्तीची आराधना करू लागले. 
                  ज्या मनुष्याने तो पाषाण पायदळी तुडवला होता; तो मनुष्य एक दिवस मंदिरात आला. त्याने भक्तिभावाने त्या मूर्तीचे दर्शन घेतले. परंतु त्याने पायदळी तुडवलेल्या पाषाणातून ही सुंदर मूर्ती घडवली असल्याची त्याला कल्पना नव्हती. या जगातील लोकही असेच आहेत. प्रत्येकामध्ये, प्रयेक गोष्टीत,सर्वत्र दिव्यत्व वास करते म्हणून कधीही कोणाची उपेक्षा वा अनादर करू नका. तुम्ही एखाद्या गोष्टीची उपेक्षा केलीत तर तीच गोष्ट एक दिवस तुमच्यासाठी पूजनीय ठरेल. 

संदर्भग्रंथ :-  DIVINE STORIES  
                       and parables 

 
जय साईराम 
 

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " साधनेच्या मार्गाद्वारे साधक अध्यात्मिक उंच उंच शिखरे पादाक्रांत करतो.   "

पुष्प ४७ पुढे सुरु 

                     आता आपण याविषयी पाहू . स्वामी आता म्हणतात ," आता तुझे शारीरिक क्लेश संपले . आता तू मुक्त पक्ष्यासारखी माझी प्रतिक्षा करते आहेस ." माझ्या हृद्यनिवासातून प्रेममार्गावर वाटचाल करत स्वामी भूतलावर अवतरतील . D म्हणजे descends  आणि e म्हणजे earth ( पृथ्वीवर अवतरतील ) ते पृथ्वीवर आले की मला त्यांच्याकडे बोलावतील. आम्ही सर्वजण तेथे जाऊ . हिल हाऊसमधील कॉटवर मी नेहमीप्रमाणे स्वामींचा फोटो हातात घेऊन बसेन . स्वामी विचारतील , " हा फोटो कशासाठी ?" आणि ते माझ्या शेजारी बसतील . इथे सांगता होईल . दोन महाशक्तींच्या संयोगाने वैश्विक स्फोट होईल . जगामध्ये प्रचंड उलथापालथ होईल . निर्मितीपूर्वी झालेल्या वैश्विक स्फोटासारखाच हा स्फोट असेल . स्तूप उघडून त्यातील अणु ' तारका स्पंदने ' होऊन संपूर्ण विश्व व्यापून टाकतील.  जगातील सर्वांच्या स्पर्श संवेदनांमध्ये परिवर्तन होईल. कलियुगाचे सत्य युग बनेल . कलियुगातील दुष्प्रवृतींचे परिवर्तन होऊन सद्गुणांचा प्रसार होईल. 
                   पाच पांढऱ्या लिलिची फुले ५ कोश, ५ प्राण, ५ कर्मेंद्रिये व ५ ज्ञानेंद्रिये यांच्या शुद्धीचे द्योतक आहेत. सर्वत्र सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा ही पाच मूल्ये विद्यमान असतील . सद्गुणांचा उदभव होईल. मी स्वामींना ISI चा अर्थ विचारला. स्वामी म्हणाले, " मी ( I ) साई ( S ) नाही, तुझ्या भावविश्वाद्वारे मी ( I ) ' मी ' विना ' मी ' वसंता होऊन येत आहे ." मी साई विना वसंता होऊन येत आहे . माझ्या भावविश्वातून येणार असल्यामुळे ते असे सांगत आहेत . माझ्या भावविश्वाद्वारे स्वामी पुन्हा येतील.

जय साईराम 

व्ही. एस. 




    वसंतामृतमाला ४७ व्या पुष्पा बरोबर समाप्त होत आहे. यापुढील श्री वसंतसाईंचे  ' मी विना मी ' हे आत्मचरित्र क्रमशः प्रसिद्ध करणार आहोत.  

रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

"केवळ साधना आणि परिवर्तन याद्वारे परमेश्वराची प्राप्ती होते. "

पुष्प ४७ पुढे सुरु 

११ जून २०१३ प्रातर्ध्यान
वसंता - स्वामी हे तुम्ही काय लिहिले आहे ? 
स्वामी - तू आनंदात राहा. आता इथून पुढे तुला क्लेश होणार नाहीत. मी तुझ्या हृदयनिवासातून पृथ्वीवर अवतरणार आहे. तू शांतपणे प्रतिक्षा कर. मी येईन. 
वसंता - स्वामी आता तुम्ही यायला हवे. तुम्ही मला बोलवाल ना ? 
स्वामी - निश्चितच, मी तुला बोलावेन. तू येशील. 
वसंता - स्वामी आपण जेव्हा प्रथम एकमेकांना पाहू तो क्षण कसा असेल ?
स्वामी - तू कॉटवर माझा फोटो घेऊन बसलेली असशील. मी म्हणेन मी प्रत्यक्ष इथे असताना आता फोटो कशासाठी ? असे म्हणत मी तुझ्या शेजारी बसेन. दोन महाशक्ती एकमेकांना भेटल्यावर त्याची वैश्विक स्फोटामध्ये परिणती होईल. हा तो स्पर्श आहे. जगामध्ये प्रचंड उलथापालथा होईल. विश्वातील सर्वांच्या स्पर्श संवेदनांमध्ये परिवर्तन घडेल. हा ' वैश्विक स्फोट ' आहे. त्यानंतर स्तुपाच्या कार्यास प्रारंभ होईल. 
वसंता - मला समजले स्वामी. या दिवसाची मी प्रतिक्षा करते आहे. स्वामी या ५ लिलिच्या फुलांचा अर्थ काय ? 
स्वामी - पंचकोश, पंचप्राण, पंचकर्मेंद्रिये आणि पंच ज्ञानेंद्रिये आपल्या विवाहाद्वारे शुद्ध आणि पवित्र बनतील. 
ध्यानसमाप्ती 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम
         

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" केवळ प्रेमानेच सत्याची प्राप्ती होते. "

पुष्प ४७ पुढे सुरु 
१० जून २०१३ 
                     मी नेहमी स्वामींना काहीतरी लिहिण्याविषयी प्रार्थना करते . रात्री आम्ही दिव्य टपालाचा शोध घेत असताना आम्हाला एका चिठ्ठीच्या मागे एक चित्र चितारलेले आढळले . त्या चित्रात स्वामींनी डोळे , नाक आणि तोंड काढून SMILE , BE HAPPY असे लिहिले होते . त्या दोन्हीच्या मधोमध  ।S। लिहिले होते व त्या चित्राखाली You are a free bird now. त्याखाली peace, Love लिहून त्या दोन शब्दांमध्ये पुन्हा ।S। लिहिले होते. 
                     पुढे स्वामींनी I ways walk. असे लिहिले व त्या I च्या खाली d आणि e लिहून त्यांनी एक हृद्य काढले व त्याच्या खाली waiting for असे लिहले.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम

रविवार, ३१ जानेवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

            " प्रत्येक जीवात्म्यामध्ये असणारी अभेद्य आदिशक्ती म्हणजे परमेश्वराची सर्वज्ञ शक्ती होय."

पुष्प ४७ पुढे सुरु 

                    केवळ आमच्या भावविश्वाद्वारे सर्व विवाह संपन्न होतील. सर्व पुरुषांमध्ये स्वामींचे भाव असतील तर सर्व स्त्रियांमध्ये माझे. म्हणजे प्रत्येक विवाह हा आमचाच असेल. हे स्वामींचे अवतार कार्य आहे. वयाच्या १६ व्या वर्षी माझा विवाह झाला परंतु कोणाशी झाला याविषयी मी अज्ञात होते. मी वैवाहिक जीवनाची ६ वर्षे आनंदात होते. त्यानंतर आमची ताटातूट झाली. आता आमच्या ६० व्या विवाहदिनी आम्ही एकत्र येऊ. यामुळे कलिचे उच्चाटन होऊन सत्ययुगाची पहाट होईल. 
                       हेच लिलिचे फूल अंत्यविधीसाठीही वापरले जात. हा कलियुगाचा मृत्यू, दुष्प्रवृत्ती दुर्गुण व अज्ञानाचा मृत्यू आहे. आता मृत्यूचा अंत्यविधी येणार. हा कलियुगाचा मृत्यू असून सत्ययुगाचा विवाह आहे. हा एक विचित्र प्रसंग आहे. एकाच दिवशी कलियुगाचा मृत्यू होईल व सत्य युगाचा विवाह संपन्न होईल. केवळ भगवंतासाठी हे फुल दोन्ही प्रकारे कार्य करते. ज्या दिवशी स्वामींची आणि माझी भेट होईल. तो सत्ययुगाचा विवाह असेल. त्या दिवसापासून स्तूप आणि विश्व ब्रम्ह गर्भ कोटम कार्यास प्रारंभ होईल. प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराची सर्वज्ञता दिसून येते ! हे फुल दोन्ही प्रकारे असे कार्यरत आहे हे स्वामी आमच्या जीवनाद्वारे दर्शवतात. हे फुल विवाह आणि अंत्यविधी अशा परस्परविरोधी प्रसंगांसाठी वापरले जाते. तथापि कोणाच्याही आयुष्यात हे दोन्ही प्रसंग एकाच वेळी आलेले नाहीत. स्वामी हे आमच्या जीवनाद्वारे दर्शवतात. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " आसक्तीविना प्रेम दिव्य आहे. हे दिव्यप्रेम म्हणजेच परमेश्वर. "

पुष्प ४७ पुढे सुरु

                     हे आम्ही इंटरनेटवर वाचले. आमच्या बाबतीत लिलि जिझसच्या पुनरूत्थानाचे प्रतिक नसून स्वामींच्या पुनरुत्थानाचे घोतक आहेत. स्वामींनी देह त्याग केला व ते आता पुन्हा नवीन देह धारण करून येत आहेत. माझी श्रद्धा, निर्मलता आणि पावित्र्य याद्वारे ते परत येतील. माझा देह अक्षत आहे. स्वामी म्हणाले माझ्या तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर माझे कौमार्य परतले. अशा तऱ्हेने मी माझे तारुण्य आणि निरागसता जपली. माझे सदाचरण, शुचिर्भूतता आणि सत्याचे तेज यांचे लिलि प्रतिनिधित्व करते. या सत्याचे तेज सहस्त्र दली कमल अशा माझ्या सहस्त्रारात फाकले. 
                     फूल नैसर्गिक सौंदर्य सुचित करते. आत्मा म्हणजे मनुष्याचे नैसर्गिक सौंदर्य होय. सर्वांनी आपले आत्मिक सौंदर्य जाणले पाहिजे. हे खरे सौंदर्य आहे. ही माझी तृष्णा आहे. ६ व्या विवाहदिनाचे प्रतिक असे हे फुल स्वामींनी मला ६० व्या विवाहदिनी भेट दिले. माझ्याशी वयाच्या १६ व्या वर्षी विवाह करून माझ्या ७६ व्या वर्षी स्वामीनी हे सत्य जगासमोर प्रकट केले. स्वर्गामध्ये स्वामींसमवेत मी स्वर्गीय आनंद अनुभवला ते अनुभव मी शुद्ध विचारांनी आणि प्रभावीपणे लिहिते. स्वामी सांगतात आणि मी लिहिते . हे भाव स्तूपाद्वारे बाह्यगामी होत तारका स्पंदने बनून सर्वांमध्ये प्रवेश करतात. भगवान सत्य साईंचे सत्य आणि वसंताचे प्रेम यांच्या संयोगाने सर्व ज्ञानी होतात. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम