रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " प्रत्येक क्षणी आपल्याला आपल्या आचरणाची जाणीव असायला हवी. आपण आपल्याला शुद्ध निर्मल  बनवायला हवे."

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम

१४ जानेवारी २००३, वैकुंठ एकादशी

                आम्ही प्रेमयज्ञातील अग्निज्वालांचा फोटो घेतला. त्यामध्ये ॐ आणि रथाचे चित्र दिसत होते. स्वामी म्हणाले," हा ॐ रथ सत्ययुगाच्या आरंभाचा निदर्शक आहे. तू म्हणालीस, की मुक्तीच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्यांसाठी तुला प्रेममार्ग बनायचे आहे. तू तो प्रेमअश्व आहेस, जो सर्वांना रथातून सत्ययुगाकडे घेऊन जात आहे."

राधा कृष्ण विवाह 
                   मी आश्रमात रहायला आल्यानंतर अधिकच अश्रू ढाळू लागले. शरीर निवेदन करायचे म्हणून देहशुद्धीसाठी केलेल्या पूर्ण साधनेनेही मी समाधानी नव्हते. ' मी दुसऱ्या व्यक्तीशी का विवाह केला ? हा देह केवळ परमेश्वरासाठी जन्मला आहे. तो दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीचा कसा  होऊ शकेल ? असा अशुद्ध देह मी परमेश्वराला कसा अर्पण करू ?" या विचारांनी मी होरपळून निघत होते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " प्रत्येकक्षणी आपल्याला आपल्या आचरणाची जाणीव असायला हवी. आपण आपल्याला शुद्ध, निर्मल बनवायला हवे. "

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम
 
                वेगवेगळ्या इमारती कोणत्या जागी बांधाव्या ह्याबद्दल आम्ही आश्रमाच्या जागेचा नकाशा देवघरात ठेवून स्वामींना विचारले. स्वामींनी त्या जमिनीची दोन भागात विभागणी केली आणि त्यातील पश्चिमेकडची जागा इमारतींसाठी वापरावी असे सांगितले. स्वामींनी गणेश मंदीर बांधण्याची जागाही दाखवली. 
                बांधकाम सुरु झाले." तुमच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेली पुट्टपर्तीची रेती मला हवी आहे." अशी मी स्वामींकडे प्रार्थना केली. स्वामी म्हणाले," तू वडक्कमपट्टीतील वाळूही घे. त्यामध्ये तुझ्या ६३ वर्षांच्या तपाची शक्ती आहे. " आणि म्हणून पुट्टपर्तीतील ध्यानवटवृक्षाच्या जवळची आणि वडक्कमपट्टीतील वाळू गोळा करून पायाभरणी करताना त्यामध्ये घालण्यात आली. 
१९ ऑक्टोबर २००२
               मुक्ती निलयमचा उद्घाटन समारंभ झाला . स्वामी म्हणाले," मुक्ती निलयम भूलोक वैकुंठ आहे. "
               एकदा मी स्वामींना विचारले," आपण भूलोक वैकुंठामध्ये घेऊन जाऊ या का ?"
                स्वामी म्हणाले," भूलोक वैकुंठात घेऊन जाता येणार नाही, परंतु आपण वैकुंठ भूतलावर आणू शकतो. सर्वांना मुक्ती देण्यासाठी, वैकुंठ 'मुक्ती निलयम ' बनून इथे आले आहे."

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 
 
            " भगवंताशी ऐक्य म्हणजे योग. अखंड (२४ तास ) नामस्मरणाने हा योग साध्य होतो."

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

                 स्वामींनी मला विश्वाचे वैकुंठामध्ये परिवर्तन करण्याच्या कार्यात सहभागी करून घेतल्यापासून, माझ्या हृदयातून प्रेमामृत ओसंडत आहे. सर्वांना मुक्ती मिळण्याची हमी हीच माझी तृष्णा आहे. या भव्यदिव्य कार्यासाठी अशा साधना आवश्यक आहेत. 
                 मुक्ती निलयम आश्रमाच्या पायावर विश्वामध्ये परिवर्तन घडून सत्ययुगाची पहाट होणार आहे. 
                 आश्रमासाठी जमीन खरेदी करताना आगाऊ रक्कम देण्याअगोदर स्वामींची अनुमती व आशीर्वाद घेण्यासाठी वेदिकेवर एक पत्र ठेवण्यात आले होते. त्याच्यावर पदचिन्ह उमटले. स्वामी म्हणाले, "आगाऊ रक्कम द्या. मी माझे पहिले पाऊल जमिनीवर टाकले आहे. "
                  जागेचे पैसे २२ जून २००२ ह्या दिवशी दिले. आठ आठवड्यानंतर आम्ही भूमीपूजा केली. आरतीच्या वेळेस स्वामी साक्षात होऊन माझ्या समोर उभे राहिले. " स्वामी !स्वामी !" हाका मारत मी अश्रूंमध्ये बुडाले. कार्यक्रमास आलेल्या सर्वांना मी सांगितले, "स्वामी इथे प्रत्यक्ष सदेह उभे आहेत." स्वामी जिथे उभे होते ती जागा, आरती झाल्यांनतर मी सर्वांना दाखवली. मऊशार मातीमध्ये स्वामींची पदचिन्हे स्पष्टपणे उमटली होती ! आम्ही सर्वांनी वाकून नमस्कार केला. आश्रमाच्या मातीवरील स्वामींनी ठेवलेल्या पहिल्या पावलांची आठवण म्हणून स्वामींच्या पदुकांसाठी एक वेदिका बांधावी असे आम्ही ठरवले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

           " जीवन हे एक स्वप्न आहे. जेव्हा आपण (जागृतीतील स्वप्न ) स्वप्नातून जागे होतो तेव्हा कळते हा सर्व परमेश्वराचाच दिव्य खेळ आहे."

प्रकरण अकरा

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम

                माझा देह अमृत झाल्यांनतर पृथ्वीवर सत्ययुग अवतरेल. माझे प्रेम संपूर्ण जगासाठी आहे. जर मी विचार केला असता की ते केवळ माझ्यासाठी आहे ; तर गेली ६० वर्षे जशी मी एकटीच परमेश्वरासोबत जगत होते, तसेच मी ते पुढे चालू ठेवले असते. मग हा आश्रम बांधण्याची तरी गरजच काय ? पृथ्वीचे संरक्षण व्हावे व सर्वांना मुक्ती मिळावी म्हणून हे अवतारकार्य आहे. स्वामींनी त्यासाठी आश्रम बांधण्यास सांगितला. 

मुक्तीचे निवासस्थान 

                स्वामींनी सांगितले की आश्रमाचे बोधचिन्ह अमृत कलश असावे. अमृताचे तीन थेंब खाली सांडत असलेल्या स्थितीत तो कलश थोडा कलंडलेला असावा. त्या थेंबामध्ये तामिळ भाषेत ' मुक्ती ' हा शब्द लिहावा. ' शक्तीकडून मुक्ती ' हे बोधवाक्य त्या कलशाच्या बाजूने वर्तुळाकारात लिहावे. 
                स्वामी म्हणाले ,
                " तू अमृत कलश आहेस. तू जगाला अमृत देणार आहेस. नवीन आश्रमाचे नाव मुक्ती निलयम (मुक्तीचे निवासस्थान ) असेल. जे कोणी आश्रमात येतील त्यांना अमरत्वाचे अमृत मिळेल. "

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" अतृप्त इच्छाच केवळ पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचे कारण ठरते. " 

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

                जर मी त्यांची आहे तर जे काही माझे आहे ते सर्व त्याचेच आहे. मी देहासकट माझे सर्व अस्तित्व केवळ त्यांनाच अर्पण करेन. परमेश्वरास सदेह समर्पित होणे हे शरीर निवेदन आहे. साधनेचे नवीन शिखर. जोपर्यंत मी साईंच्या चरण कमलांवर मला स्वतःला अर्पण  करत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला शांती लाभणार नाही, माझे अश्रू थांबणार नाहीत. माझा संग्राम चालूच राहील. भगवद्प्राप्तीची माझी उत्कट इच्छा कधीही न शमणारी आहे. स्वामी म्हणतात, साधना म्हणजे न शमणारी तृष्णा. 
                 मी कौटुंबिक जीवन जगत असताना अखंड साधना केली. या साधनेमुळे वसिष्ठ गुहेमध्ये स्वतःला शुद्ध सत्व करून मी भगवंताशी संयुक्त झाले. शरीर निवेदन करण्यासाठी मी आश्रमात आले. माझे  कौटुंबिक जीवन ही माझी व्यक्तिगत साधना आहे, तर माझे आश्रमातील वास्तव्य हे जगाकरता आहे. मी प्रकृती असल्यामुळे मला शरीर निवेदन करण्याची इच्छा आहे. या जगामध्ये, परमेश्वराला देह अर्पण करण्याचा कोणी विचार तरी करेल का ? मग माझ्यामध्ये ही जगावेगळी इच्छा का निर्माण झाली ? मी कोण आहे, हे सत्य दर्शविण्याकरिता मी सर्वांहून वेगळी आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 
 

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " नदीच्या पाण्यात तरंगणाऱ्या ओंडक्या सारखे व्हा, प्रवाहाच्या विरुद्ध पोहाल तर धडपडत राहाल म्हणून प्रवाहाच्या दिशेने तरंगा. शांती, आनंद प्राप्त करा, आंनदी व्हा परमेश्वराला त्याचे इच्छेनुसार तुमचे जीवन घडवू द्या. "
 
प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

                  आजपर्यंत काही संतमहात्म्यांनी त्यांच्या देहाचे रूपांतर ज्योतीमध्ये केले आहे. परंतु कोणी आजपर्यंत हाडामांसाच्या देहाचं अमृतमय देहात परिवर्तन केले आहे का ? भगवान म्हणाले," जशी विद्युत शक्ती चुंबकीय शक्तीमध्ये रूपांतरित केली जाते, तशी तुझी प्रेमशक्ती अमृतामध्ये रूपांतरित केली जाईल. हा देह बाहेरून एखाद्या सर्वसामान्य देहाप्रमाणेच दिसेल पण प्रत्यक्षात तो प्रेमाने परिपूर्ण भरलेला असेल. "
                  सर्वसामान्य देह मृत्यूनंतर धरणीवर पडून नष्ट होतो. परंतु हा देह अमृतदेह आहे. जीवनामृतमय आहे. तो अमर आहे, अमर्त्य आहे म्हणून भगवान बाबांपर्यंत देह आणि आत्मा या दोन्हीसकट पोहोचण्याचे माझे ध्येय होईल. 
                   माझ्या शरीरातील रक्ताचा एखादा थेंब किंवा एखादी पेशीसुद्धा वाया जाऊ नये असे मला वाटते. मला माझे एखादे नख वा केसही जमिनीवर पडलेला आवडत नाही. माझा देह धरणीवर पडावा किंवा अग्नीचे भक्ष्य व्हावा, अशी माझी अजिबात इच्छा नाही. परमेश्वराने मला जे काही दिले आहे ते सर्व त्यालाच परत करावे असे मला वाटते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम
 

रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" केवळ ईश्वर सत्य आहे म्हणून त्याची इच्छा बाळगा."

प्रकरण अकरा

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम
 
               मी ध्यानातून जागी झाले तेव्हा माझी साडी विभूतीने पूर्ण भरली होती. मी शुद्ध सत्व बनून शुद्ध सत्वामध्ये, स्वामींमध्ये विलीन झाले. सर्वसाधारणपणे ही अवस्था प्राप्र्त झाल्यावर व्यक्ती देहत्याग करून परमेश्वरमध्ये विलीन होतो. तथापि देहसुद्धा परमेश्वराला अर्पण करण्याच्या माझ्या इच्छेमुळे मी देहत्याग केला नाही. 
                मी विचार केला, ' हा  देह का बरं धरणीवर पडावा ? ' मी आचार, विचार आणि उच्चार या सर्वासकट परमेश्वराशी संयुक्त झाले आहे. माझ्या देहाचा एक अणुसुद्धा वाया जाता कामा नये. सर्वकाही त्यांचेच आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. हा देहही त्यांचाच आहे. तो त्यांनाच अर्पण केला पाहिजे. या उत्कट इच्छेमुळे मी परमेश्वराला असा वर देण्यासाठी प्रार्थना केली. स्वामी म्हणाले," तुझा देह अमृतमय होईल. तू माझ्यामध्ये विलीन होशील." 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम