रविवार, ७ जानेवारी, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार आपण कसे जगणार हे ठरवतो."


कर्माचा हिशोब मिटला  

            म्हणूनच, वसंतमोहिनी प्रभूंना खुष करून त्यांच्या हातातील कर्माचा तराजू काढून घेण्याचा प्रत्यत्न करीत आहे. कसा बरं ? तिच्या प्रेमाने, तपश्चर्येने आणि तिच्या अश्रुंनी ती प्रभूंचं कोमल हृदय स्रवण्याचा प्रयत्न करत आहे. हे पाहून ते कर्मतराजू टाकून देऊन विश्वमुक्ती प्रदान करतात.
            कारणाशिवाय त्यांनी तराजू खाली ठेवला नाही. परमेश्वर स्वतःचा कायदा मोडत नाहीत. तराजू म्हणजे तराजू. प्रत्येकाचा कर्माचा हिशोब अगणित आहे. तो समतोल व्हायला हवा. कर्महिशोब समतोल करण्यासाठी मी माझी शक्ती, माझी तपश्चर्या तराजूच्या एका पारड्यात ठेवली. त्यामुळे सर्वांचे कर्माचे हिशोब समतोल झाले. विश्वमुक्तीचे वरदान प्राप्त झाले.

   

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




गुरुवार, ४ जानेवारी, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " सौंदर्य भक्तिचे दुसरे नावं आहे."


कर्माचा हिशोब मिटला  

           विष्णुंनी स्वतःचे मोहिनीत परिवर्तन केले आणि नंतर पुन्हा विष्णू झाले. स्वामींनी स्वतःचे आधुनिक पार्वतीमध्ये परिवर्तन केले आणि नंतर पुन्हा बाबा झाले.
           स्वामी म्हणतात, ' माझ्यावर प्रेम करण्यासाठी मी मला विभाजित केले.'
           मोहिनी त्यांच्यापासून प्रकट झाली- वसंतमोहिनी म्हणजेच स्वामी - स्वामी म्हणजे वसंतमोहिनीच - स्वामी म्हणजे आधुनिक पार्वती - आधुनिक पार्वती म्हणजे वसंता - दोघी एकच आहेत - पार्वती तपश्चर्या करून शिवाची अर्धांगिनी झाली. त्याचप्रमाणे वसिष्ठ गुहेत स्वामींमध्ये संयुक्त झाल्यावर मी त्यांची अर्धांगिनी (उजवी बाजू) झाले.
            माझ्यासाठी, सर्व सारखेच आहेत ; मग ती मुंगी असो वा ब्रम्हा, मी सर्वांसाठी मुक्ती मागते आहे. लहानपणापासूनच सर्व सामान आहेत ही माझी धारणा होती. हा मोहिनीच्या हातातील तराजू आहे - सर्वांबरोबर समानतेने अमृत वाटून घेण्याचा तिचा विचार आहे. विष्णुंच्या हातात कर्माचा हिशोब आहे. प्रत्येकाच्या कर्मानुसार ते फल देतात. अशाप्रकारे, कर्माच्या फळातून कोणीही सुटू शकत नाही.

   

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



रविवार, ३१ डिसेंबर, २०२३


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " तुमच्या सर्व कर्तव्यांचा त्याग करा. परमेश्वर प्राप्ती हेच तुमचे कर्तव्य आहे."


कर्माचा हिशोब मिटला  

     
२२ जुलै २००७ सकाळचे ध्यान
वसंता - स्वामी, माझं मोहिनीवरील लिखाण कसं आहे ?
स्वामी - तू म्हणालीस की विष्णू, मोहिनी म्हणून आले. मी मला वसंतमोहिनी म्हणून अलग केले.
वसंता - अगदी बरोबर, स्वामी.
स्वामी - या मोहिनीने मला भुरळ पाडून माझ्या हातातून कर्माचा हिशोब खेचून घेतला.
ध्यानाची समाप्ती.

           महाविष्णुंनी मोहिनीचे रूप घेतले. विष्णुंनी स्वतःला स्वतःपासून अलग करून मोहिनीचे रूप घेतले. दोघेही एकच आहेत. स्वामींनी स्वतःपासून मला निर्माण केले. कसे ते पाहू या. ज्याप्रमाणे विष्णू, मोहिनी बनून आले, त्याचप्रमाणे स्वामींनी स्वतः ' आधुनिक पार्वती' चे रूप घेतले.
*हे रूप, मी १२ वर्षांची असताना जशी होते तसेच आहे. १९५० साली, स्वामींनी स्वतःचे चष्मा घातलेल्या ' आधुनिक पार्वती ' चे रूप दाखवून नंतर पुन्हा बाबांचे रूप धारण केले.

* लिबरेशन हिअर इटसेल्फ राइट नाऊ, भाग ३ पहा.  

   

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. सुरवातीला जरी ते यांत्रिकपणे होत असेल तरी नाम घेत राहा. भाव आपोआप येतील. "


कर्माचा हिशोब मिटला  

 

          क्षीरसागराप्रमाणे मी माझं हृदय घुसळून काढलं. जसजशी मी घुसळत राहिले, तसतशा अनेक गोष्टी प्रकट झाल्या. राधा, दुर्गा, महालक्ष्मी, रुक्मिणी, सीता आणि सत्यभामा सगळ्या आल्या. अंतर्यामी तांदळाच्या अग्राच्या आकाराचा असलेला लहानसा निळा प्रकाश मोठा होत गेला. आज्ञाचक्राशी राधाकृष्णाचे, शिवशक्तीचे  मिलन झाले. तरीसुद्धा मी घुसळतच राहिले. सहस्रदलाच्या कमळातून अमृतकलश प्रकट झाला. आता त्या इवल्याशा निळ्या प्रकाशाला कोटी सूर्यांचे तेज आले व तो अमृतकलशाला जाऊन भिडला. त्याचा स्पर्श झाल्याबरोबर अमृतकलश फुटला आणि सहस्रारातून अमृत भरभरून वाहू लागले. त्याचा आवेग दुथडी भरून वाहणाऱ्या एखाद्या नदीप्रमाणे होता. हे अमृतमयी भाव स्तूप शोषून घेतो आणि त्याचा जगभर फैलाव करतो.
           स्वामी म्हणाले ' माझ्या हृदयाचे घुसळणे ', ' अमृतकलश फुटणे ' ते हेच होय. या अमृतकलशाच्या ओथंबून वाहण्याने कलियुगाच्या मातीचे परिवर्तन होईल, त्यामुळे त्याचे अमृतयुग येईल. मातीचं सुवर्ण होईल. माझे स्वामी! माझे प्राण ! माझे लाडके प्रभू संपूर्ण जग एका छत्राखाली आणतील. सर्वत्र फक्त प्रेमाचंच राज्य असेल.     

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २४ डिसेंबर, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

       भौतिक वस्तूंमधून मिळणारी शांती ही खरी शांती नव्हे, याचे जेव्हा मनुष्याला ज्ञान होते आणि तो शांतीचा मूलस्त्रोत्र शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या आध्यात्मिक यात्रेचा प्रारंभ होतो. "


कर्माचा हिशोब मिटला  

 

          लोकांच्या सांगण्यावर माझा विश्वास बसतो. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमधील गर्भितार्थ मला कळत नाही. जग हे असं आहे. मग मी विचार करते, "माझे प्रभू, स्वामीपण असंच बोलतात का ?त्यांनी मला सांगितले की ते मला नाविन्यपूर्ण रितीने हिरवी साडी देतील. प्रथम ते म्हणाले की ती देवलोकातून येईल, मग म्हणाले की एका अधिकाऱ्यामार्फत येईल. मी वाट पहात राहिले. शेवटी, ती खरोखरच विलक्षणरित्या आली. माझं साधंभोळं, खेडवळ मन, फक्त सरळ अर्थच समजू शकत. मुक्ति स्तूपाच्या उद्घाटन सोहळ्याच्यावेळी स्वामी म्हणाले की ते निळी साडी घेण्यासाठी पैसे देतील. त्यांच्याकडून रु. ३०००/- आले पण अप्रत्यक्षरितीने. माझ्यासाठी परमेश्वर प्रत्यक्षपणे काही करू शकत नाही का ? हा गुप्ततेचा बुरखा का ? मला काही समजत नाही. या जगात मला कळतं ते फक्त प्रामाणिक मनमोकळं प्रेम.   

   

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम





 

शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

 ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सूक्ष्म साई वा स्थूल साई 

              श्रीकृष्णाने त्याच्या वयाच्या ७५ व्या वर्षी, अर्जुनाला गीतेची शिकवण दिली जी कृष्ण लहान असताना गोपगोपिंनी आचरणात आणली होती. गीतेचा जन्म होण्याअगोदरच,त्यातील शिकवण साध्यासुध्या आणि निरक्षर गोपींनी त्यांच्या जीवनामध्ये आचरणात आणली होती. गीतेविषयी त्या अनभिज्ञ होत्या परंतु त्यांनी त्या मार्गावर वाटचाल केली आणि कृष्णभावामध्ये जीवन कसे जगावे हे दाखवून दिले. त्यांना कुटुंब होते मुलेबाळे होती,त्या सर्व घरकामही करत होत्या,दूध आणि लोणी विकण्यासाठी मथुरेला जात होत्या.
             ही सर्व कामे करताना त्या सदैव कृष्णाच्या चिंतनात गढलेल्या असत. त्यांचे जीवन म्हणजे कृष्णाने शिकवलेल्या कर्मयोगाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
 गोपगोपींचे जीवन म्हणजे एक जीती जागती गीता होती आणि त्यांची जीवन पद्धती म्हणजे योग होता कारण परमेश्वराच्या प्रेमामध्ये ते स्वतःला पूर्णपणे विसरून गेले होते त्यामुळे कर्मयोग, संन्यास योग, परित्याग मार्ग बनला. पूर्वीच्या काळी कृष्णाच्या सवंगड्यांनी वनात अथवा गुहेमध्ये जाऊन तप केले नाही परंतु ते सदैव कृष्णभावात जीवन जगले वृक्षवल्लीमध्येही त्यांनी कृष्णाला पाहिले.परमेश्वराला सर्वत्र पाहण्याचे त्यांना उपजत ज्ञान होते.
            ते त्रिगुणातीत असल्यामुळे त्यांना त्यांच्या उच्च अवस्थेची जाणीव नव्हती. ही त्रिगुणातीत अवस्था त्यांना जन्मजात प्राप्त होती.एवढेच नव्हे तर महाज्ञानी अक्रूरालाही या साध्याभोळ्या गोपींकडून ज्ञानाचा लाभ झाला. उद्धवाने जेव्हा राधेला आणि गोपींना मोक्षाची शिकवण दिली तेव्हा त्यांनी त्याला अत्यंत सोप्या शब्दात गीतेमधील तत्त्वज्ञान सांगितले. त्या म्हणाल्या," आम्हाला मोक्ष किंवा स्वर्ग नको, कृष्णचिंतनातील दिव्य आनंद आम्हाला पुरेसा आहे." अशा तऱ्हेने गोपींनी त्यांच्या प्रेमाखातर मोक्षाचाही त्याग केला. त्यांचे जीवन म्हणजे गीतेमध्ये शिकवलेल्या त्यागाचे आणि " सर्वधर्मान्परित्यज्य " या श्लोकाचेही उदाहरण आहे. श्री रामकृष्ण परमहंस यांनी म्हटले आहे की गोपी मुमुक्षु होत्या. मुमुक्षु सर्व तपस्वी योगी आणि जीवनमुक्तांहून श्रेष्ठ आहेत.
अशा गोपींच्या जीवनातून दर्शवली जाणारी गीता भगवानांनी अर्जुनाला शिकवली. अर्जुनामुळे अखिल जगताला गीता प्राप्त झाली. लोकांनी कृष्ण आणि गोपींच्या नात्याविषयी, चुकीच्या कल्पना केल्या आहेत. गोपी महाज्ञानी होत्या आणि देहभाव विसरून त्या दिव्य चैतन्यामध्ये समरसून गेल्या होत्या. लोकं त्यांची विशुद्ध भक्ती समजू शकत नाहीत. गोपींचे शुद्ध भाव जाणून घ्यायला हवेत. अज्ञानी लोकं रासलीलेचा गैरअर्थ लावतात. त्यांना परमेश्वरामध्येही दोष दिसतात. त्याचप्रमाणे, जे लोक देह भावामध्ये अडकलेले असतात त्यांना, प्रेम,भक्ति आणि मधुरभाव हे देहभाव आहेत असे वाटते.
             स्त्री साधकांनी अत्यंत सावध आणि दक्ष राहिले पाहिजे. निरंतर साधना करून त्यांनी देहभावाच्या पलीकडे जायला हवे.साधनेविना कोणतीही गोष्ट घडणे शक्य नाही. देहभावाला जिंकल्याशिवाय मधुरभाव अशक्य आहे. ते केवळ भगवानांचे नाव कलंकित करेल. जे लोक कृष्णा विषयी वाईट बोलतात तेच आज भगवान साईकृष्णाविषयीही वाईट बोलतात.
            गोपींसारखेच आपणही आपल्या भक्तीने आपल्या हृदयात राहणाऱ्या आत्मनिवासीला आपल्यासमोर साकार केले पाहिजे. हे केवळ पूर्णज्ञानाचा उदय झाल्यानंतरच शक्य होते. पूर्ण ज्ञान प्राप्त होईपर्यंत सर्व अनुभव, भ्रम म्हणजेच मनाचे खेळ असतात. आपण मनाच्या पलीकडे जायला हवे. ज्ञानाने चित्तशुद्धी होते आणि म्हणून आपले सर्व अनुभव सत्य असतात. या अवस्थेला पोहोचण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.
 प्रल्हादाच्या भक्तीने भगवान विष्णूंच्या नरसिंह अवतारास
खांबामधून प्रकट होण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे गोपींच्या भक्तीने, कृष्णाला प्रत्येक गोपीसाठी प्रकट होण्यास भाग पाडले. जर त्यांनी हे केले तर आपण का करू शकत नाही? जर आपण गीतेमध्ये आखून दिलेल्या मार्गावर वाटचाल केली तर आपण हे घडवून आणू शकतो. कृष्णाने त्याचा वयाच्या ७५ व्या वर्षी गीतोपदेश केला. गोपींच्या जीवनाचे उदाहरण असलेली गीता त्याने शिकवली. गोपींचे जीवन हीच गीता बनली. कृष्ण परमात्म्याने भगवान श्री सत्यसाई बाबा म्हणून जन्म घेतला आणि आपले जीवन गीता बनून जावे यासाठी ते आपल्याला गीतेची शिकवण देत आहेत. त्यांच्या वयाच्या ७५ व्या वर्षी, भगवानांनी मला माझे जीवन म्हणून नवीन गीतेचे लेखन करण्यास सांगितले.

श्री वसंतसाई

संदर्भ - श्री वसंत साईंच्या इथेच! या क्षणी!! मुक्ती!!! भाग - ३ या पुस्तकातून


जय साईराम

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      मन नेहमीच नाकारात्मकतेवर केंद्रित असते. त्याला सकारात्मक बनवा आणि म्हणा, " मी सर्वांवर प्रेम करतो." "


अमृतकलश फोडला 

 

          मी हे लिहित असताना मला आठवले, फ्रेड नेहमी म्हणतात की यज्ञ करताना मी यज्ञात आहुती दिलेल्या प्रत्येक समिधेवर तूप टाकते, एकही सुटू देत नाही. मी प्रत्येक काडीला तुपाने न्हाऊ घालते, तिला पवित्र आणि शाश्वत बनवते. समिधांची आहुती देताना मी म्हणते की मी प्रत्येक समिधेला मुक्ती प्रदान करीत आहे. या दिव्य दृश्यासाठी हे उदाहरण अगदी योग्य आहे.

 
२१ जुलै २००७ दुपारचे ध्यान
वसंता - स्वामी, जर सर्व अवयव नीट झाले, तर मला हे शरीराच नको. तुम्ही घेऊन टाका. मी डॉक्टरकडे अजिबात जाणार नाही. मला या जीवनाची आवश्यकता नाही. मी पुन्हा जन्म घेईन आणि हा देह तुम्हाला पुर्णम् स्थितीत अर्पण करण्यासाठी साधना करीन. मी तुमच्याशी धडपणे बोलूही शकत नाही.
स्वामी - रडू नकोस. मी इथे कोणासाठी आलो आहे ? फक्त तुझ्यासाठी. जगातील दुःख पाहून त्यांना मुक्ती देण्यासाठी तू आलीस. मी तुझ्यामागे आलो. ह्याच कार्यासाठी आपण पुन्हा यायचं का ? बस ! आता पुरे झाले. धरतीचं परिवर्तन करून जाऊ या.
वसंता - अजून किती दिवस आपल्याला सोसावं लागणार ? जसा तुम्ही मला तुमचा डोळा दिलात, तसेच मला तुमचे दातही द्या.
स्वामी - तू जगात सर्वांना निर्दोष बनवणार आहेस. सर्व काही अमृतमय बनव. तू तो परीस आहेस, ज्याच्या स्पर्शाने लोहाचे सुवर्णात रूपांतर होते. तू सर्वांमध्ये प्रवेश करून त्यांचे भाव सुवर्णमय करतेस. तू कलिचे लोहयुग सत्याच्या सुवर्णयुगात बदलत आहेस.
वसंता - खरंच असं ]होईल का ? मी या प्रकरणाला ' अमृतकलश फोडला' असे नाव देईन.
स्वामी - लिही. अमृतकलश म्हणजे काय ? तुझ्या हृदयाच्या घुसळण्यातून अमृत आलं. तुझ्या हृदयातील प्रेमामृत उसळून वर आलं आणि सहस्राराला जाऊन भिडलं. सहस्त्रार उघडून ते वेगाने बाहेर पडत संपूर्ण जग व्याप्त करीत आहे. स्तूप हेच दर्शवतो.
ध्यानाची समाप्ती.

*     *     *

   

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम