ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल."
१२
कर्मसंहार
श्री.व सौ. इंदुलाल शाह
हे श्री सत्यसाई आंतरराष्ट्रीय समितीचे निवृत्त कोऑर्डिनेटर आहेत. स्वामींनी या दाम्पत्याला आशीर्वाद दिला आणि त्यांच्या तर्फे साई समितीतील सर्वांची कर्मे धुतली गेली. त्यांनी स्वामींना तेल लावले. तेव्हा या प्रतिनिधींनी सर्व कर्म स्वामींना अर्पण केली.
श्री.व सौ. गंगाधरण
गेल्या पाच पिढ्या ह्यांची कुटुंबे स्वामींची भक्त आहेत. अशी अनेक कुटुंबे आहेत जी अनेक पिढ्या स्वामींचे भक्त आहेत. आजोबा, वडील, मुलगा, नातू सर्वजण स्वामींची पूजा करतात. तरीसुद्धा, मधल्या काही काळात अहंकाराचा कलंक स्पर्श करून जाऊ शकतो. उदाहरणार्थ, आजोबा, पणजोबा, खूप मोठे भक्त असतील; त्यांच्या भक्तीमुळे त्यांना मिळालेल्या मनाचा वडील आणि मुलगा अहंकाराने गैरवापर करत असतील. श्री गंगाधरण अशा कुटुंबाचे प्रतिनिधित्व करतात आणि स्वामींजवळ त्या सर्वांच्या चुका आणि गैरवागणुकीची क्षमा मागतात. स्वामी त्यांना आशीर्वाद देतात.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा