ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. "
१२
कर्मसंहार
निर्मला ही स्वर्गीय अप्सरा आहे. देवांकडून काही चुका झाला असतील तर माफ करावे अशी तिने स्वामींजवळ प्रार्थना केली. तिने देवांची प्रतिनिधी म्हणून तेल घेतले.
यामिनीने कुबेरलोकाची प्रतिनिधी म्हणून तेल घेतले. कुबेरातील सर्वांच्या चुका माफ कराव्या यासाठी तिने प्रार्थना केली.
श्रीलता आणि प्रभाकर हे भूलोकाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी जास्त तेल घेतले आणि पृथ्वीवरील ५८० करोड लोकांची कर्म धुतली जाण्यासाठी प्रार्थना केली.
प्रशांती निलयम आणि मुक्ती निलयम दोन्ही ठिकाणी एकाचवेळी कर्मसंहार केला गेला. अशाप्रकारे स्वामींनी आणि मी सुरु केलेल्या कर्मसंहाराची सांगता झाली. तेलाच्या पवित्र विधीने स्वामींनी समाजाच्या प्रत्येक भागासाठी कर्मसंहार कसा केला गेला हे दाखवले. ही कर्म नाहीशी होण्यासाठी कित्येक हजार जन्म घ्यावे लागले असते. स्वामींनी तेल लावण्याच्या पवित्र विधीतून कर्माचे ओझे हलके केले. आजपर्यंत कुठल्याही अवताराने हे केले नाही.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा