रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

श्री वसंतसाईचा वाढदिवसानिमित्त संदेश

          
          जेव्हा तुम्ही परमेश्वरावर प्रेमाचा वर्षाव करता तेव्हा ते प्रेम तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. आरशामध्ये स्वतःला पाहताना, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर धूळ लागलेली पाहता तेव्हा तुम्ही ती धुवून टाकता. पुन्हा आरशात पाहिल्यावर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ दिसतो. त्याचप्रमाणे मनावरही धूळ बसलेली असते. ही धूळ कर्मामधून निर्माण होते. ही धूळ तुम्ही धुवून टाकली पाहिजे. ही कर्माची धूळ ही केवळ एका जन्मातील नसून शेकडो जन्मातील असते. जीवनभराच्या अतृप्त इच्छांमधून मन दूषित होते. ही तुमची जीवनभराची कमाई आहे. 
          जग हे क्षणभंगुर नात्यांनी आणि वस्तुंनी भरलेले आहे. मनुष्य नावलौकिक, कुटुंब, संपत्ती, पद, प्रतिष्ठा आणि ' मी आणि माझे ' ह्याच्याशी संबंधित सर्वकाही संपादन करण्यात त्याचा वेळ खर्ची घालतो. त्याच्यामुळे किती गुण आणि सवयी निर्माण केल्या जातात ? केवळ परमेश्वर शाश्वत आणि सत्य आहे. तुम्ही तुमची सर्व कर्तव्यकर्म परिपूर्ण आणि अनासक्त भावाने केली पाहिजेत. भगवान श्री सत्यसाई बाबंनी ८४ वर्ष हीच शिकवण दिली. तुम्ही तुमचे जीवन, वाईट सवयी आणि दुर्गुण काढून टाकण्यासाठी आणि सर्वांना भरभरून प्रेम देण्यासाठी खर्ची घातले पाहिजे.   
श्री वसंतसाई 



जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा