रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
    " प्रत्येकाचा स्वतःचा व्यक्तिगत स्वभाव असतो व त्यानुसार भक्तिचे रूप आणि पद्धत बदलते. "
१२
कर्मसंहार 

         श्री. व सौ. शौरी 
         हे दोघे सिक्युरिटी स्टाफचे प्रतिनिधित्व करतात. ते स्वामींना तेल लावतात आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांची कर्म माफ करण्यासाठी स्वामींजवळ प्रार्थना करतात. कळत, नकळत झालेल्या चुका व वाणी, आचारविचारातून झालेली पाप यांची कर्म होतात. हे दांपत्य स्वामींना तेल लावते आणि निरपराध्याला शिक्षा करणे, कठोरपणे बोलणे आणि अधिकाराचा गैरवापर करणे अशा प्रकारच्या चुका त्यांच्या हातून झाल्या असतील तर त्यासाठी क्षमा मागतात. 
         श्री. व सौ. मार्गबंधु 
         ही दोघे गेली अनेक वर्षे प्रशांती निलयममध्ये राहत आहेत. ते स्वामींना तेल लावतात आणि प्रशांती निलयममध्ये राहणाऱ्या सर्वांसाठी क्षमेची प्रार्थना करतात. स्वामी त्यांना आशिर्वाद देतात. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....  
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा