रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " जर तुम्ही सर्वांवर भरभरून प्रेम केलेत तर तेच प्रेम तुमच्याकडे येईल. "
१२
कर्मसंहार 

         स्वामींच्या वाढदिवसाला वेगवेगळ्या दांपत्यांनी स्वामींना तेल लावले. त्यांच्यामार्फत स्वामी हे काम करीत आहेत.
         श्री. व सौ. रत्नाकर 
         स्वामींच्या नातेवाईकांच्या अनेक पिढ्या निरनिराळ्या ठिकाणी रहात आहेत. त्यांनी स्वामींना तेल लावले. त्या सर्वांच्या वाणी, आचार विचारातून काही चुका झाल्या असतील तर स्वामी त्यांना क्षमा करून आशीर्वाद देतात. 
          श्री. व सौ. भगवती 
          हे सुप्रिम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत. ज्यांनी गुन्हे केले आहेत, अशा लोकांचे ते प्रतिनिधित्व करतात. न्यायाधीश म्हणून, ते स्वामींकडे वाणी, आचार विचारातून झालेल्या गुन्ह्यांची क्षमा मागतात. ते दयेचा अर्ज देतात. स्वामी कर्मसंहार करून त्या दांपत्याला आशीर्वाद देतात.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा