ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जग एक आरसा आहे, ज्यामध्ये मनुष्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसते. जगातील सर्व रूपे तुमचीच रूपे आहात. "
१२
कर्मसंहार
स्वामींनी मला ७ नोव्हेंबरपासून २३ दिवस भोगलेल्या व्यथांविषयी लिहायला सांगितले. मी १ डिसेंबरला लिहिण्यास सुरुवात केली आणि ६ डिसेंबरला लिखाण पूर्ण केले. हे कर्मसंहारासाठी होते. पुट्टपर्तीला, स्वामींच्या वाढदिवसालाही तसाच कर्मसंहार झाला. कसे ते आपण पाहू या.
स्वामींच्या वाढदिवशी, निवडक दांपत्यांना, येऊन स्वामींना तेल लावण्यास सांगितले गेले. प्रत्येकानी फुलानी तेलाचा एक थेंब घेऊन स्वामींना लावला. सोहळा पूर्ण झाल्यावर त्याच तेलानी भक्तांनी स्वतःला पण थेंबभर तेल लावून घेतले. हे कर्मसंहारासाठी होते. स्वामींनी आणि मी जगाची कर्म आमच्या देहांवर घेतली आणि म्हणूनच आम्हाला यातना होतात. त्याचप्रमाणे आम्ही जगाचा काम आमच्या भावनांवर घेऊन वियोगाच दुःख सहन करीत आहोत. ही दोन्ही जर संपली, तरच आम्ही एकत्र येऊ. जगाची कर्म कशी संपणार ? जगातील काम कसा संपुष्टात येईल ?
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा