गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

     " मनुष्य सिध्दींद्वारे जडवस्तूंचे सृजनीकरण करू शकतो परंतु जर तो त्याच्याही पलीकडे गेला तर तो परमेश्वर म्हणून स्वतःचे प्रकटीकरण करू शकतो. " 


अवतार डॉल (बाहुली)

 

           मला शरीर नाही, मग ते पुरणार कसे ? माझे शरीर ज्योत बनून अदृश्य होणार. मी दहन केली जाऊ शकत नाही. हे शरीर नसून तेजोगोल आहे. मी संयुक्त झाल्यावर, धुळीच्या कणाकणात, सजीव, निर्जीव वस्तूत पुन्हा जन्म घेईन. हा जीव पाण्याच्या प्रत्येक थेंबातून, वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकेतून आणि अग्नीच्या प्रत्येक ज्वाळेतून पुनरुज्जीवित होईल. संपूर्ण विश्व म्हणजे माझ्या पुनरुत्थानाचे मैदानच होय. या वैश्विक- शक्तीचे अमर्याद सामर्थ्य अवतारांच्या मर्यादा तोडून टाकते.
            ...मी या अफाट विश्वात शक्ती चे आनंददायी नृत्य पाहत आहे. तिच्या उजव्या तळहातावर सत्यसाई अवतार आणि डाव्या तळहातावर इतर अवतार आहेत. अवतार करू शकणार नाहीत असे अवघड कार्य, अवताराची चित्शक्ती पूर्ण करू शकते. अवताराची चित्शक्ती, अमर्याद शक्तीसह अवतारापासून मानवी रूप घेते. अवतारांनी केलेले धर्मस्थापनेचे कार्य हे या शक्ती पुढे नगण्य आहे; ते अगदीच सामान्य वाटते. ती त्यांना तिच्या तळहातांवर धरते. ह्या शक्ती ने ' अश्वत्थ्य वृक्ष ' धरतीवर आणला आहे, ही सत्य शक्ती आहे, हे प्रेमाचे वैश्विक रूप आहे, किनारा दृष्टीक्षेपात न येणार ज्ञानाचा महासागर आहे. जोपर्यंत ती सर्व सत्य काढून प्रकट करत नाही तोपर्यंत हे प्रेम थांबणार नाही.

  

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा