गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

     " जो दुसऱ्याला काया, वाचा ,मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय. " 


अवतार डॉल (बाहुली)

२७ जून २००७, सकाळचे ध्यान
वसंता - मला माझा हा देह समर्पण करण्यासाठी परिपूर्ण आणि निर्दोष बनवायचा आहे.
स्वामी - तू सर्व काही करशील. तू विश्वरूप घे. 


दिव्य दृश्य

...मी हे सर्व करेन. मी सर्वव्यापी, सर्वज्ञ व सर्वशक्तिमान आहे. मी विश्वरूप घेऊन ह्या विश्वात सर्वव्याप्त होईन, हे विश्व मी होईन. मी अमर्याद शक्ती आहे. मीच ती सर्वव्यापी विश्वशक्ती आहे. नाडीग्रंथ सांगतात की, मी जिथे राहते, ती जागा जीवसमाधी होईल.
सृष्टीच्या कणाकणातून माझी जीवशक्ती स्त्रवू लागेल. माझ्या अंतिम संयोगानंतरही, अखिल सृष्टीमध्ये मी वास करीन. माझ्या जीवशक्तीचा पूर येऊन सर्वत्र दुथडी भरून वाहू लागेल. सर्व अवतार माझ्या विश्वरूपाच्या तळ्यातील बहुलेच आहेत. प्रत्येक युगात काही विशिष्ट कार्यासाठी अवतार असतात. आजपर्यंत त्यांनी केलेली कार्ये नगण्य आहेत. धर्मस्थापना व्यर्थ आहे. या शक्ती अवतारासमोर इतर सर्व अवतार बाहुल्यांप्रमाणे आहेत. जेव्हा शक्ती अवतरते, तेव्हा ती कशातही बंदिस्त राहू शकत नाही. तिला मर्यादा नाहीत. ही अमर्याद शक्ती विश्वरूप घेते, अश्वत्थ वृक्षाला खाली आणून पृथ्वीवर रोपण करते. ही अमर्याद, सर्वव्यापक, सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. ही स्वतःपासून सर्वांची निर्मिती करते. 

  

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा