ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनुष्य सिध्दींद्वारे जडवस्तूंचे सृजनीकरण करू शकतो परंतु जर तो
त्याच्याही पलीकडे गेला तर तो परमेश्वर म्हणून स्वतःचे प्रकटीकरण करू शकतो.
"
४
अवतार डॉल (बाहुली)
स्त्रीचे तिच्या पतीवरील उत्कट प्रेम हेच तर खरं तिचं पातिव्रत्य. पतिव्रता प्रचंड ऊर्जा निर्माण करू शकते. अशा स्त्रियांनी त्यांच्या पातिव्रत्याने अनेक महान कार्य केली आहेत. कळागीने मदुरै शहर भस्मसात केले. सावित्रीने यमराजाशी वाद घातला आणि आपल्या मृत पतीला पुन्हा जीवित केले. नलयिनीने सूर्यास उदयापासून रोखले. हे सर्व फक्त पातिव्रत्याच्या सामर्थ्याने शक्य झाले. मर्त्य मानवांशी विवाह झालेल्या या सर्व पतिव्रतांची ताकद इतकी महान होती तर कल्पना करा ज्या स्त्रीचा परमेश्वराशी विवाह झाला, तिची पातिव्रत्याची शक्ती किती श्रेष्ठ असेल !
संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा