गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

     " मनुष्य सिध्दींद्वारे जडवस्तूंचे सृजनीकरण करू शकतो परंतु जर तो त्याच्याही पलीकडे गेला तर तो परमेश्वर म्हणून स्वतःचे प्रकटीकरण करू शकतो. " 


अवतार डॉल (बाहुली)


           अगदी लहानपणापासून माझी कृष्णाशी विवाह करण्याची जबरदस्त इच्छा होती. त्याच्या विचारात मी सतत रडत असे. माझा त्याच्याशीच विवाह झाला आहे. हे माहित नसल्यामुळे मी रडत असे. या एकमेव विचाराने झपाटून मी जगत होते. एकाग्रतेच्या या शक्तीने कुंडलिनी जागृत होऊन सहस्रार उघडले. सहस्रारमधून एक आराखडा उदयास आला नव्या निर्मितीचा आराखडा. या शक्तीने विश्वरूप धारण करून जगाची उलथापालथ करायला सुरुवात केली. अश्वत्थ वृक्ष धरतीवर आणला गेला. परमेश्वराने त्याच्या पूर्ण शक्तीनिशी पृथ्वीवर अवतार घेतला आहे. सत्य पृथ्वीवर मूळ धरणार आहे. या मुळांमधूनच नवी सृष्टी उगवेल. एका निःशक्त वेलीची शक्ती विशाल अश्वत्थ वृक्षाला हलवून खाली खेचत आहे आणि पृथ्वीवर त्याचे रोपण करीत आहे.
परमेश्वर = सत्य = सत्यसाई
प्रकृती = प्रेम = वसंतसाई
 

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा