शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
रत्न - ८  

भक्ती म्हणजे काय


भक्ताचा हृदयातून ओसंडून वाहणारे प्रेम परमेश्वराला दर्शवणे म्हणजे भक्ती होय. हे प्रेम स्वाभाविकपणे आपल्या हृदयाच्या गाभ्यातून उद्भभवते. भक्ती कृत्रिम असू नये. ती निसर्गतः आपोआप उद्भवायला हवी. ती कशी उत्पन्न होते? केवळ परमेश्वरच शाश्वत आहे बाकी सर्व काही अशाश्वत आहे, हे जर आपण जाणले तर भक्तीचा  ओघ वाहू लागतो. आपण आपल्या जीवनाच्या अशाश्वतेवर पुन्हा पुन्हा चिंतन केले पाहिजे. येथे विवेक बुद्धी आवश्यक आहे. एकदा आपण जाणले की जीवन अशाश्वत आहे तर आपले मन स्वतःच त्यापासून सुटका  करणाऱ्या मार्गाचा शोध घेईल.
अर्ध्या तासाच्या भक्तीला भक्ती म्हणत नाहीत. भजन गान  ही सुद्धा भक्ती नाही. केवळ २४ तास भक्ती हीच खरी भक्ती आहे. ही भक्ती कशी करावी हे कर्मयोग आपल्याला  शिकवतो. आपण  आपली सर्व कर्म  परमेश्वराच्या चिंतनात राहून कशी करावीत याविषयी मी माझ्या 'साई गीता प्रवचनम' या पुस्तकातील , कर्मयोग प्रकरणामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे.  हे आपण करायलाच हवे. त्यासाठी प्रेम आणि परिपूर्णता असणे अनिवार्य आहे.  परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी प्रत्येक क्षणी आपण आपल्या सद्सदविवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे. ही भक्ती होय. प्रत्येक क्षणी परिपूर्णता हे भक्तीचे सूत्र आहे.प्रत्येक क्षणी परिपूर्णता याचा अर्थ काय? याचा अर्थ आपल्या अं:तकरणातून उद्भवणारे विचार,  उच्चार आणि आचार  हे सर्व परिपूर्ण असायला हवेत. यासाठी प्रेम हा पाया आहे. आपण सदैव, सर्वांना, कोणत्याही परिस्थितीत प्रेम दर्शवणे म्हणजेच भक्ती होय. जर हा मापदंड लावला तर जगातील किती  लोकांकडे अशी भक्ती असेल?

--श्री वसंत साई अम्मा

जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा