ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनुष्य सिध्दींद्वारे जडवस्तूंचे सृजनीकरण करू शकतो परंतु जर तो
त्याच्याही पलीकडे गेला तर तो परमेश्वर म्हणून स्वतःचे प्रकटीकरण करू शकतो.
"
४
अवतार डॉल (बाहुली)
ही सर्वव्यापक, सर्वसामाविष्ट, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान शक्ती नूतन जग निर्माण करणारे आहे. या नूतन जगातील प्रत्येक अणू हा तिच्या अमाप प्रेम, ज्ञान आणि सत्यापासून बनलेला असेल. अवतार त्यांच्या मर्यादेत कार्य करतात; त्यांना स्थळ, काळ, रूप, नाव आणि परिस्थितीचं बंधन असते. माणसाच्या विश्वरूपाला स्थळकाळाचे, परिस्थितीचे बंधन नसते. माणसाचे विश्वरूप स्थळकाळ तसेच नावरूपात बंधिस्त करता येत नाही. तिला ना कुंपण, ना अडथळे ना संस्थांचे बंधन. ती कुठल्याही नीती नियमांच्या अथवा शिस्त, कायद्यांच्या बंधनात जखडलेली नाही. तिच्यामध्ये निसर्गाच्या कायद्यांवर विजय मिळवण्यासाठी आणि पुराणांचे नीतीनियम आणि धर्माचे निर्बंध तोडण्यासाठी ताकद आहे. ही आहे पूर्णम् अवस्था - परिपूर्ण ज्ञानाची, परिपूर्ण प्रेमाची आणि परिपूर्ण सत्याची अवस्था.
संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा