ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
गोकुळाष्टमीचे महत्त्व
कृष्णाचा जन्म कृष्ण पक्षामध्ये झाला. जेव्हा अं:धकार असतो तेव्हा परमेश्वराच्या तेजाची झळाळी आणि तेजाचा प्रभाव अधिक दिसतो. अस्थिरता, असलेल्या या जगामध्ये स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी कृष्णाने जन्म घेतला.
कृष्णाचा जन्म अष्टमीला झाला. अष्टमी त्रास आणि अडचणींशी संबद्ध आहे. त्रास कधी उद्भवतो?
जेव्हा सदाचरणाचे विस्मरण होते. कृष्णाचे आगमन, अं:धकाराचा नाश, त्रास आणि अडचणींचे निर्मूलन, अज्ञानाचा अं:धकार दूर करून मानवजातीला आत्मज्ञानाची शिकवण देणे या गोष्टींचे संकेत देते गुरु ही कृष्णाची प्रमुख भूमिका होती. त्याने अर्जुनाला गीता शिकवली. त्यांनी अर्जुनाला सांगितले," तू केवळ माझे साधन हो!" त्याद्वारे कृष्णाने घोषित केले,
" तुझा साधन म्हणून उपयोग करून मी संपूर्ण जगामध्ये सुधारणा घडवत आहे." दिव्यत्वाने दिलेली सं पूर्ण शिकवण धर्म आणि प्रेमाशी संबंधित आहे. गोपिका कृष्णाला अशी प्रार्थना करत," हे कान्हा! आम्ही आमच्या हृदयात तुला प्रस्थापित केले आहे. तू कधीही आमचे हृदय सोडून जाऊ नकोस."
१४ऑगस्ट १९९०च्या दिव्य संदेशातून
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा