ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनुष्य सिध्दींद्वारे जडवस्तूंचे सृजनीकरण करू शकतो परंतु जर तो त्याच्याही पलीकडे गेला तर तो परमेश्वर म्हणून स्वतःचे प्रकटीकरण करू शकतो. "
४
अवतार डॉल (बाहुली)
वसंता - स्वामी, स्वामी हे काय ? तुम्ही माझ्या तळहातावर आहात असे मी म्हणाले. नाही ! नाही, तुम्ही माझ्यापेक्षा वरच्या स्तरावर हवेत. पत्नी नेहमी पतीपेक्षा खालच्या स्तरावर असली पाहिजे. मला असे दृश्य का बरे दिसावे ? मी हे असे का लिहिले ?
स्वामी - रडू नकोस, रडू नकोस. सगळं काही बरोबर आहे. पातिव्रत्याच्या शक्तीविषयी तू किती लिहिले आहेस ! सावित्रीचं पातिव्रत्य मृत्युदेव यमराजाकडून पतीचं जीवन पुन्हा मिळते. नलयिनीने सूर्योदय होण्यापासून सूर्यास थोपवले. दमयंतीने पातिव्रत्यसुद्धा सामर्थ्यवान होते. हे सगळे पातिव्रत्याच्या महान शक्तीचे पुरावे आहेत. यातून तुझ्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याचे दर्शन होते.
वसंता - स्वामी, मी म्हणाले की मी सर्व करीन आणि तुम्ही माझ्या तळहातावर आहात. एक पतिव्रता अशा गोष्टीचा विचार तरी करू शकते का ?
स्वामी - तू काय लिहिलेस ? तू लिहिलेस की तू तुझे विश्वरूप पाहिलेस, शक्तीचे वैश्विक नृत्य पाहिलेस. तू अवतारांना तुझ्या हातात पाहिलेस. मला सांग कोणी पाहिले ? काय पाहिले ?
वसंता - मला माहित नाही स्वामी.
स्वामी - तू पाहिलेस. तू तुझ्या शक्तीचे विश्वरूप पाहिलेस. तुझी शक्ती सर्व काही साध्य करणार आहे. तुझी शक्ती म्हणजेच तुझ्या पातिव्रत्याचे सामर्थ्य. ही तुझ्या, माझ्यावरील अमर्याद प्रेमाची शक्ती आहे. तू माझी आहेस.
वसंता - स्वामी, मला तुमच्यापासून दूर करू नका.
स्वामी - हे कसं शक्य आहे ? तुझ्या, माझ्यावरील प्रेमाची शक्तीच सर्वकाही साध्य करणार आहे. अवतारांपेक्षा शक्ती अधिक सामर्थ्यवान असते हे ती सिद्ध करणार आहे.
ध्यानाची समाप्ती.
संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा