रविवार, ३१ मार्च, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

         " सर्वांना प्रेम द्या परंतु कोणत्याही एका व्यक्तीप्रती अधिक प्रेम प्रदर्शित करू नका. "


        सहस्रार
          

          अवतार जे कार्य करू शकत नाही, ते कार्य ज्या व्यक्तीचे परमेश्वरावर नितांत प्रेम आहे, अशा व्यक्तीच्या सहस्राराचा प्रकाश पूर्ण करते. अवतार साक्षी अवस्थेत असतात, त्यामुळे त्यांचे कार्य काही मर्यादेपर्यंत सीमित राहते. ते स्वतःभोवती योगमायेचा पडदा घालतात आणि फक्त मर्यादित उघड करतात. उदाहरणार्थ, स्वर्गातून पडणाऱ्या गंगा नदीच्या प्रवाहाचा जोर धरती सहन करू शकली नसती, म्हणून शंकराने तिला आपल्या पुस्तकात धारण केले व जटांमधून तिचा प्रवाह जाऊ दिला. त्याचप्रमाणे परमेश्वराची संपूर्ण शक्ती धरती सहन करू शकणार नाही, म्हणून अवतार स्वतः योग मायने झाकून फक्त थोडेसे वैभव प्रकट करतात. श्री सत्यसाई अवतार त्याचे परिपूर्ण रूप प्रकट करत नाहीत. ते वेळोवेळी थोडेसे वैभव दाखवतात, परंतु त्यांच्या निर्मितीची गुपिते उघड करीत नाहीत.
             माझी भक्ती परमेश्वराकडून अनेक सत्य आणि गुपिते खेचून घेऊन उघड करते. जेव्हा मनुष्य परमेश्वर अवस्था प्राप्त करतो, तेव्हा त्याला अत्युच्च गुपिते सांगितली जातात. ती जगाच्या कल्याणासाठी उपयोगात आणली जातात. एखादी व्यक्ती परमेश्वर कशी बरे होऊ शकते? माणसाची कुंडलिनी नवीन योग कसे निर्माण करू शकते? हेच मी जगाला दाखवून देत आहे. माझे स्वामी वरील एकाग्र प्रेम, त्यांच्या प्राप्तीचा ध्यास, यातूनच निर्मितीची गुपिते प्रकट होत आहेत.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २८ मार्च, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

" जसे भाव तसे जीवन. "


        सहस्रार
          

           रावण आणि हिरण्याक्ष यांनी इतकी तपश्चर्या केली होती की ते परमेश्वराची संभाषण करून वर मिळवत. परंतु त्यांच्यातील नाममात्र दुर्गुणामुळे त्यांचं स्वतःचं तपसामर्थ्यच त्यांच्या विनाशास कारणीभूत झाले. एखादी व्यक्ती साधनेत जसजशी उच्चस्तरावर  पोहोचते, तसतसे अधिक जागरूक राहणे अत्यावश्यक असते. आपल्यातील दुर्गुण ओळखून ते नाहीसे करायला हवेत. जर ते दूर केले गेले नाहीत, तर आपली तपश्चर्येची शक्ती ते हुडकून काढून आपल्या विनाशाचे कारण होऊ शकते.
            पुढील उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होईल. एखादा माणूस चार पायऱ्या चढला आणि पडला तर त्याची दुखापत तितकीशी गंभीर नसेल. परंतु जर तो 100 पायऱ्या चढला आणि पडला, तर कदाचित प्राणही गमवू शकतो. त्याचप्रमाणे, सर्वसामान्य माणसाने चुका केल्या तर त्याचे परिणाम फारसे नसतील. परंतु ज्यांनी आध्यात्मिक शक्ती प्राप्त केली आहे, अशा लोकांनी अगदी शुल्लक चूक केली तर त्याचे महाभयंकर असे परिणाम होतात. ज्यांच्यात काही दोष नाहीत अशा व्यक्तींच्या तपाची शक्ती जगाच्या कल्याणासाठी वापरली जाते.

 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



रविवार, २४ मार्च, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

" परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी प्रेम हा मार्ग आहे. "


        सहस्रार
          

            हिरण्याक्षाने  तपश्चर्या केली. त्याला परमेश्वराचे दिव्य दर्शन झाले. त्याने देवाकडून अनेक वर मिळवले. परंतु त्याचा अहंकार इतका प्रचंड वाढला की शेवटी त्याला वाटले, तो स्वतःच देव आहे.  परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन, त्याच्याशी संभाषण करून आणि वर मिळवूनसुद्धा अहंकाराने त्याचा सर्वनाश झाला. रावण आणि हिरण्याक्ष हे दोघेही त्यांच्या दुर्गुणांमुळे सर्वनाशास कारणीभूत झाले.

            या लहानशा 'मी' मध्ये इतर सर्व शक्ती निकामी करण्याचे सामर्थ्य आहे. अध्यात्मात अगदी उच्च स्वरावर गेलेले आणि ज्यांना परमेश्वरी दृष्टान्तही ही झाला आहे अशांचाही विनाश होऊ शकतो. यावरून हे स्पष्ट होते की आध्यात्मिक मार्गावरील माणसाने किती काळजीपूर्वक वागायला हवे.
 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम