ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
वेदध्यानेन इति वेदः। वेद एखाद्या विषयावर पूर्ण प्रकाश टाकतात किंवा त्याचे पूर्णपणे विवरण करतात. वेद म्हणजे सर्व प्रकारच्या ज्ञानाचे प्रचंड आणि अमर्याद भांडार आहे. सामान्य मनुष्याला त्याचा अभ्यास करणे व त्यामध्ये प्रावीण्य मिळवणे अवघड वाटते. वेदांचा अभ्यास करणे सुलभ व्हावे यासाठी व्यासांनी वेद संकलित केले. ऋग्वेदांमध्ये स्तुतीवर श्लोक, पवित्र मंत्र आणि सामर्थ्यशाली सुत्रे ह्यांचा समावेश आहे. यजुर्वेदामध्ये देवांना प्रसन्न करण्यासाठी करण्यात येणाऱ्या यज्ञ यागांच्या पद्धतींविषयी विषयी माहिती दिली आहे. सामवेदामध्ये निर्मिती आणि निर्माता ह्यांच्या स्तुतीवर गीतांचा समावेश आहे.
वेदांचा अभ्यास म्हणजे परमोच्च ज्ञानाचे अध्ययन होय ह्यामधून मृत्युवरवर विजय मिळवण्याचे ज्ञान प्राप्त होते. वेदांचा अभ्यास म्हणजे प्रमोद चे ज्ञानाचे अध्ययन होय यामधून वृत्तीवर विजय मिळवण्याचे ज्ञान प्राप्त होते वेद शाश्वत आनंदावस्थेचा मार्गदर्शवतात जेथे ना जन्म आहे ना मृत्यू! ते आपल्याला परमेश्वर प्राप्तीचे ज्ञान देतात. जे वेदांचा अर्थ जाणून तसेच त्याच लोकांमध्ये भावांची अनुभूती घेऊन वेद उच्चारण करतात त्यांना परमज्ञान सत्य, आणि ब्रह्मविद्या प्राप्त होते आणि त्याद्वारे ते सर्व जाणतात. केवळ हे ज्ञान भक्ती करणाऱ्याला व ज्याची भक्ती केली जाते अशा दोघांनाही पूर्णत्वाचा आनंद देते. वैदिक ऋषीमुनींनी प्रार्थना केली," हे परमेश्वरा तू वेदस्वरूप आहेस तू मला गाई गुरे मुले बाळे यांच्या भाराने व्याप्त करू नकोस प्रमोदच्या धनदौलतीचा स्त्रोत असणारे ज्ञान तू मला प्रदान कर त्या अनमोल ठेव्याने मी पूर्णपणे संतुष्ट होईन. ती मी तुझ्या सेवा कार्यातही वापरली की मलाही धनसंपदा असेल तर तुलाही आनंद होईल.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा