ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रथम भाव निर्माण होतात, त्यानंतर त्याचे विचार बनतात. त्यावर कृती करण्या अगोदर विवेकाचा वापर करा. विचार करा, हे सत् कृत्य आहे का ? परमेश्वर प्राप्तीसाठी मला हे सहाय्य करेल का ? "
८
सहस्रार
हृदयमंदिरात आत्मा हा तांदळाच्या आग्रा इतका निळ्या स्फुल्लिंगाप्रमाणे रहात असतो. आपण जसजशी आपली अध्यात्मसाधना चालू ठेवतो, तसतशी ही शक्ती वाढत जाते आणि सहस्त्रार उघडून प्रकट होते. हीच आहे "मी विना मी' ची अवस्था. इथे अहंकार नसतो, फक्त प्रकाश. परमेश्वर सर्वत्र आहे. सहस्त्र पाकळ्यांमध्ये ' मी' नाही, त्यामुळे इथे भौतिक गोष्टींची वासना नाही. फक्त परमेश्वर. तो फक्त स्वयंप्रकाशित दिव्याप्रमाणे चमकत राहतो. 'अहं' नष्ट झाल्याने फक्त 'शिव' उरतो. जीवाला स्वतःचे वेगळेपण रहात नाही, आणि तो 'शिव' च उरतो; म्हणूनच, त्याला युग बदलण्याची शक्ती प्राप्त होते. हीच ती शक्ती आहे जिच्यामुळे अवतार करू न शकणारे कार्य चित्तशक्ती करू शकते.
रावणानी तपश्चर्या करून शंकराकडून अनेक वर मिळवले. त्याच्या हातांनी तो संपूर्ण कैलास पर्वत उचलू शकत होता. मग इतक्या महान, शक्तीशाली साधकाला सीतामातेची इच्छा कशी बरे झाली? त्याच्यातील वासनेमुळे त्याची सगळी शक्ती वाया गेली. ह्या अंशात्मक वासनेचा त्याच्या तपश्चर्येच्या शक्तीला स्पर्श झाला आणि तेच असुर कुळाच्या विनाशाचे कारण ठरले.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा