ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनुष्याच्या प्रत्येक विचार, उच्चार आणि आचार यामधून त्याच्यातील देवत्व प्रतिबिंबित झाले पाहिजे. "
८
सहस्रार
माझा स्वभाव फक्त प्रेम आहे. केवळ प्रेमाची जाणीव ही माझी अवस्था आहे.
म्हणूनच मुक्ती स्तूपावरील सहस्राराच्या पाकळ्या संपूर्ण उमललेल्या
दाखवल्या आहेत. कळसाची चांदणी आत्म्याच्या प्रकाशाचे प्रतिनिधित्व करते. ही
चांदणी संपूर्ण जगाला व्यापणाऱ्या माझ्या कंपनांनी दुमदुमत आहे आणि
सर्वांचे परिवर्तन करीत आहे.
रावण तपश्चर्या करीत असताना
'कामवासणा' या एका पाकळीचा ज्योतीला स्पर्श झाला, तेव्हा तिने त्याच्या
तपश्चर्याची शक्ती शोषून घेतली आणि तेच त्याच्या संपूर्ण कुळाच्या नाशाला
कारणीभूत ठरले. त्या एका पाकळीने एवढी शक्ती कशी मिळवली? याचं कारण असं की
पाकळीने प्रकाशाला स्पर्श केला. जर एक पाकळी एवढी शक्ती साठवू शकते तर मग
सहस्त्र पाकळ्यांनी शक्ती जमा केली तर काय होईल? जर पाकळ्यांनी प्रकाशाला
स्पर्श केला नाही तर तपशक्ती साठवली जाते. माझ्या बाबतीत माझी तपशक्ती
स्तूपाच्या चांदणीतून बाहेर पडत आहे. काम वासनेच्या फक्त एका विचारामध्ये
संपूर्ण असुर कुळाचा नाश करण्याची शक्ती होती. जर रावण आणि सीतेला पळवले
नसते, तर असुर कुळाचा सर्वनाश झाला नसता. ते अतिशय सामर्थ्यवान होते; परंतु
रावणाचा कामवासनेचा विचार त्यांच्या सर्वनाशास कारणीभूत झाला.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा