ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जो स्वार्थ आणि अपेक्षा यापासून मुक्त आहे, त्याला कर्माचे परिणाम बाधत नाहीत. "
८
सहस्रार
संपूर्ण जगाला मुक्ती देणे हीच माझी एकमेव इच्छा आहे. यासाठीच मी स्वामींची प्रार्थना करीत असते. यामध्ये जराही स्वार्थ नाही, कशालाही स्पर्श न केलेली सहस्त्र पाकळ्यांची एकवटलेली शक्ती जगाची कर्म नाहीशी करते. ती कलियुगाचं सुवर्ण युगात परिवर्तन घडवते. रावणाच्या एका विचाराने असुर कुळाचा सर्वनाश झाला. परंतु माझा फक्त एक विचार सर्वांमधील असुरी वृत्ती नष्ट करतो, ५८० कोटी लोकांमधील राक्षसी गुण नष्ट करतो. माझा विचार सर्वांना जीवन मुक्त स्थिती मिळवण्यासाठी सहाय्य करतो.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा