गुरुवार, २८ मार्च, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

" जसे भाव तसे जीवन. "


        सहस्रार
          

           रावण आणि हिरण्याक्ष यांनी इतकी तपश्चर्या केली होती की ते परमेश्वराची संभाषण करून वर मिळवत. परंतु त्यांच्यातील नाममात्र दुर्गुणामुळे त्यांचं स्वतःचं तपसामर्थ्यच त्यांच्या विनाशास कारणीभूत झाले. एखादी व्यक्ती साधनेत जसजशी उच्चस्तरावर  पोहोचते, तसतसे अधिक जागरूक राहणे अत्यावश्यक असते. आपल्यातील दुर्गुण ओळखून ते नाहीसे करायला हवेत. जर ते दूर केले गेले नाहीत, तर आपली तपश्चर्येची शक्ती ते हुडकून काढून आपल्या विनाशाचे कारण होऊ शकते.
            पुढील उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होईल. एखादा माणूस चार पायऱ्या चढला आणि पडला तर त्याची दुखापत तितकीशी गंभीर नसेल. परंतु जर तो 100 पायऱ्या चढला आणि पडला, तर कदाचित प्राणही गमवू शकतो. त्याचप्रमाणे, सर्वसामान्य माणसाने चुका केल्या तर त्याचे परिणाम फारसे नसतील. परंतु ज्यांनी आध्यात्मिक शक्ती प्राप्त केली आहे, अशा लोकांनी अगदी शुल्लक चूक केली तर त्याचे महाभयंकर असे परिणाम होतात. ज्यांच्यात काही दोष नाहीत अशा व्यक्तींच्या तपाची शक्ती जगाच्या कल्याणासाठी वापरली जाते.

 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा