ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
महाशिवरात्री संदेश
परमेश्वर प्रत्येकामध्ये सूक्ष्म स्वरूपात विद्यमान आहे
परमेश्वर प्रत्येकामध्ये लिंगाच्या सूक्ष्म स्वरूपात वास करतो. लिंग हा शब्द दोन अक्षरांनी बनलेला आहे लिं आणि ग. लिं चा अर्थ "ज्यामध्ये सर्व लीन होते (लियते)", ग चा अर्थ ज्यामध्ये सर्व काही सामावते. (गम्यते) लिंग हे सर्वत्र असणाऱ्या वस्तूचे प्रतीक आहे ज्यामधून सर्व घटक उत्पन्न होतात आणि ज्यामध्ये लय पावतात. लिंग हे स्वस्वरूप आहे. लिंगोद्धव म्हणजे मार्गदर्शक आणि नेतृत्व करणाऱ्या अवताराच्या आगमनाची घोषणा होय.
तुमचे हृदय परमेश्वराला समर्पित करा, तुमच्या हृदयाचे हृदय असणाऱ्या परमेश्वराशी एकरूपता साधेल. निर्मिती आणि लिंगोद्भव यांना अवाजवी महत्व देऊ नका. माझ्या महिम्याचा तो अंशमात्र भाग आहे. मी, जो विश्वाची निर्मिती करुन, अनेक गोष्टींनी ते भरून टाकतो, त्यामध्ये वैश्विक प्रेम, सदाचरण, वेदांचे पुनरुज्जीवन, चांगुलपणाचे पोषण आणि साधकांवर कृपाशीर्वादांचा वर्षाव यासारख्या अधिक पूजनीय गोष्टी आहेत.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा