ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
---श्री वसंतसाई
वेद म्हणजे काय?
या जगातील प्रत्येक जीव, त्याला जे हवे ते मिळवण्यासाठी धडपड करतो आणि त्याला जे आवडत नाही ते टाळण्याचा प्रयत्न करतो. या दोन्ही प्रयत्नांमध्ये सफलता कशी मिळवायची हे वेदांमध्ये सांगितले आहे. तसेच आदर्श जीवन जगण्यासाठी आपण काय करावे आणि काय करू नये हेही सांगितले आहे.
वेद म्हणजे सत्य शब्दांचे संकलन होय. जाणीवेच्या उच्च अवस्थेत ते ऐकण्याचे सामर्थ्य प्राप्त केले. ऋषी मुनींनी ते ऐकले. वास्तविक वेद म्हणजे परमेश्वराचा श्वास शब्द आहेत. वेदाचे आगळेवेगळे महत्त्व ह्या सत्यावरच आधारित आहे.
गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या जीवनाच्या विविध अवस्थांमध्ये कसे आचरण करावे याविषयी वैदिक ग्रंथांमध्ये निर्देश केला आहे. ह्या आचार संहितेचे पालन करण्यामागे मनावर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश आहे. त्यामध्ये विचारांची शुद्धत, विचार, उच्चार व आचार एकसंथता, समभाव, समतोल वृत्ती यावर विशेष भर दिला आहे. वेदांचा योग्य प्रकारे सराव केल्यास केवळ वैयक्तिकच नव्हे तर संपूर्ण समाजाला शांती आणि सुरक्षा लाभते. ते विश्वकल्याणासाठी आहेत. ते मनुष्याच्या मनातील दुष्प्रवृत्ती दूर करून, त्यांना चांगले विचार करण्यास प्रवृत्त करून सदाचारी जीवन जगण्यास सहाय्य करतात. वेद भौतिक आणि अध्यात्मिक दोन्ही जगांशी तसेच त्या जगांच्या पलीकडेही संबंधित आहेत.' माझी' वाणी तू प्रत्यक्ष ऐकून, हे पुस्तक अस्तित्वात आले, म्हणून हे वेद आहेत. मानवी जीवन वेदमय आहे, त्याला वेद्यातील नितीनियम पाळण्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून वेदांची जतन आणि पोषण झाले पाहिजे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा