गुरुवार, १४ मार्च, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

       " मनुष्याच्या प्रत्येक विचार, उच्चार आणि आचार यामधून त्याच्यातील देवत्व प्रतिबिंबित झाले पाहिजे. "


        सहस्रार
          

           भगवद्गीतेत आत्म्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे,
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः |
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ||
           ही अशी अवस्था आहे जिथे पंचमहाभूतांचे नियंत्रण नाही, पंचज्ञानेंद्रियांचा परिणाम होत नाही, आणि इतर कर्मेंद्रियेसुद्धा निष्क्रिय होतात.
           या स्थितप्रज्ञ अवस्थेत वाक्\, दृक्, श्रवण किंवा कुठलाही विचार यांचा आपल्यावर परिणाम होत नाही. ही पूर्णावस्था आहे. या अवस्थेला स्वामींनी 'शक्ती' असे संबोधले आहे. ही ऊर्जा प्रत्येक व्यक्तित असतेच. तिचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी स्वामी माझ्या जीवनाचे उदाहरण देतात.  

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा