रविवार, २९ जून, २०२५

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

" खरा आनंद आत्मसाक्षात्कारामध्ये प्रतिबिंबित होते. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ६७ 
 
           ज्याप्रमाणे पाण्यात चालणारी नाव वारा ओढून नेतो त्याचप्रमाणे विषयात वावरणारे मन ज्या इंद्रियाबरोबर राहते, ते इंद्रिय या आयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे कान्हा, कमला, कान्हा, कारुण्या, माझे मन इंद्रियांच्या अधीन होऊ देऊ नकोस. वैकुंठवासा, तू माझा आश्रयदाता आहेस. वाऱ्याने भरकटणाऱ्या जहाजाप्रमाणे जर मन इंद्रियांच्या कब्जात गेले तर इंद्रिये माणसाची विवेकबुद्धी नाहीशी करतात. हे परमेश्वरा, मला आत्मज्ञान दे. मला स्थिर आणि खंबीर मन दे. माझ्या शरीराला आणि मनाला विविध शक्ती दे. तू माझा आधार.शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २६ जून, २०२५

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

        " निर्मल हृदय स्वछ आरशासारखे प्रतिबिंबित होते."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ६६ 
 
           मला आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते. तसेच त्याचे मनही स्थिर नसते. निश्चयात्मक बुद्धी व स्थिर मन याशिवाय शांती प्राप्त होऊ शकत नाही आणि शांती वाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल?

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
           हे कान्हा, मला संयमीत मन दे. कुशाग्र बुद्धी प्रदान कर. कर्तव्यदक्ष बनव. शांती दे. अमरत्व दे. देवाधिदेवा, दीनरक्षका दयाळा, हे परमेश्वरा, भक्तरक्षका, तूच माझा आधार. शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

सोमवार, २३ जून, २०२५


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
              मी एस. व्हींना फोनवर ही सर्व हकीकत सांगितली. त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले," मी अत्यंत भाग्यवान आहे. तुम्ही माझ्या हातून दूधभात घेतल्यानंतर संन्यास घेणार. ही भगवानांची कृपा आहे." ते म्हणाले स्वामी आणि शिर्डीबाबा भारद्वाज गोत्रातील आहेत. परमेश्वरा! म्हणूनच मला प्रथम त्या ऋषींचे आशीर्वाद लाभले. केवढा हा योगायोग! हे देवाधीदेवा! १४ भुवनांचा अधिपती ! तुझ्या करणेसाठी मी काय बरं सत्कर्म केली आहेत? माझ्या मनातील विचार मी शब्दात कसे व्यक्त करू ? असे भावना लिहिता येतात ना सांगता येतात. हे भगवान, करुणासागरा, तुझी कृपा प्राप्त होण्यास मी सुपात्र आहे का?

१८ जानेवारी २००१ सायं ध्यान
वसंता:  स्वामी एस. व्ही. विचारत होते की तुम्ही आता भारद्वाज ऋषींना आणू शकता का?
स्वामी: मूर्ख आहे तो! मी माझ्या इच्छेने कोणालाही आणू शकतो. तुला आता जीझस् दाखवू का?

             असे म्हणून स्वामींनी मला जीझस् दाखवले. आपण त्यांना चित्रात पाहतो तसेच ते होते. त्यांनी राखाडी रंगाची लांब कफनी घातली होती. त्यांच्या मुखावर दिव्य आभा दिसत होती. त्यांच्या दर्शनातून प्रेमाची अनुभूती होत होती. त्यांनी मला आशीर्वाद दिले. ते म्हणाले," सर्व धर्मांचे लोक तुझ्याकडे येतील.
वसंता: स्वामी! स्वामी! हे सत्य आहे का?
स्वामी: तू जे पाहतेस ते सर्व सत्य आहे. तू का रडतेस? भिऊ नकोस.

            हे लिहिताना मला  अॅडलेडमधील चर्चला भेट दिल्याची आठवण झाली. आम्ही तेथे ध्यानासाठी गेलो होतो. तेथील धर्मगुरू माझ्याशी बराच वेळ बोलले. ते म्हणाले," तुम्ही चर्चमध्ये प्रवेश करता क्षणीच मला तीव्र स्पंदने जाणवली. अॅडलेड व सिडनी येथून आलेल्या बऱ्याच लोकांना स्वामींविषयी जाणून घ्यायचे होते मी त्यांच्याशी बोलले.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

रविवार, २२ जून, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

        " निर्मल हृदय स्वछ आरशासारखे प्रतिबिंबित होते."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ६४,६५ 
 
           परंतु आत्मसंयमी योगी आपल्या अधीन ठेवलेल्या व रागद्वेषरहित इंद्रियांना विषयोपभोग घेत असूनही अंत: करण्याची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखी नाहीशी होतात आणि मग प्रसन्नचित्त कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ परमात्म्यामध्ये स्थिर होते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
           हे कान्हा, माझ्या मनाला परम शांती प्राप्त होऊ दे. मला आकर्षण वा तिटकारा या दोन्ही गोष्टींपासून मुक्त कर. मला माझ्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू देत. हे प्रभू, वामना, हे परमश्रेष्ठा, हे सत्या, तू माझे आश्रयस्थान आहेस. मी तुला शरण आलो आहे. मला या क्षणी तुझ्या चरणी घे. कान्हा, मनीवण्णा, मला शांत चित्त कर. माझ्या दुःखांचा अंत होऊ दे. तू माझा आश्रयदाता आहेस. शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १९ जून, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

           " मनामध्ये कधीही न शमणारी आध्यात्मिक तृष्णा जागृत झाल्यास नरजन्माचे सार्थक होते."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ६२,६३ 
 
           विषयांची चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो. रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
           कान्हा! मी विषयांमध्ये गुरफटून जाऊन विषयासक्त होऊ नये यासाठी तू दक्ष रहा. आसक्तीतून इच्छा आणि इच्छेतून क्रोध निर्माण होऊ देऊ नकोस. वासुदेवा वैकुंठवासा वनमाला, मी तुझ्यापुढे नतमस्तक होतो. तू माझा निवारा आहेस. शरणो शरणम्. 
 
          कान्हा, मी क्रोधाने पूर्णपणे उध्वस्त झाल्यामुळे संभ्रमित झालो आहे. त्यामुळे माझी स्मरणशक्ती भ्रष्ट झाली आहे. विवेक बुद्धी नष्ट झाली आहे. आपदबंधवा, अनाथरक्षका, आदिनारायणा, हे आंडाळप्रिय श्रीरंगा, तू माझा आधार. स्वामी मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलो आहे. तुम्ही मला तुमच्या चरणांशी घेऊन जा. गोविंदा, मुकुंदा, तूच माझे आश्रयस्थान. शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



रविवार, १५ जून, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

           " सत्याचा शोध घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे तप. या तपाद्वारे ज्ञान प्राप्त होते व ज्ञानातून परमानंदाची अनुभूती होते."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ६१ 
 
           साधकाने सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून, चित्त स्थिर करून व माझ्यात तल्लीन होऊन ध्यानात बसावे. कारण ज्या पुरुषाचा इंद्रियांवर ताबा असतो त्याची बुद्धी स्थिर होते. 

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे कान्हा, सर्व इंद्रिये व्यवस्थित ताब्यात ठेवण्याचे सामर्थ्य मला दे. माझे हृदय आणि आत्मा तुझ्या ठिकाणी केंद्रित करून मला ध्यानाला बसव. मला स्थिरबुद्धी दे. निर्मल, निराकार, नित्यानंद, तूच माझा आश्रयदाता आहेस.  शरणो शरणम्. 
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, १२ जून, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

      " परमेश्वराचे अखंड चिंतन म्हणजे परमेश्वराचे अखंड सान्निध्य. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ६०
 
          हे अर्जुना ! ही इंद्रिये इतकी प्रबळ आहेत की इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेक पुरुषांच्या मनालाही ती ओढून नेतात.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे कान्हा, ही अनावर इंद्रिये, मनाचा मर्कट करतात. हे मर्कटाधिपते, श्रीरामा, वासुदेवा, वैकुंठवासा, या पथभ्रष्टाला योग्य मार्ग दाखव. हे वामना, वरद वेंकटेशा, मी तुझ्यापुढे नतमस्तक होतो. तू माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्. 
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

सोमवार, ९ जून, २०२५

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
              ते भक्त म्हणाले," स्वामी वडक्कमपट्टी येथे होणाऱ्या ध्यान सभागृहाच्या उद्घाटन समारंभाविषयी काही सांगा ना ".
             स्वामी म्हणाले," छान! छान! " मी अगोदरच एका भक्तांबरोबर निमंत्रण पत्रिका पाठवली होती. पुटपर्तीमध्ये दर्शनाची वेळी स्वामींनी ती स्वीकारली.
१८ जानेवारी २००१ रोजी साश्रू यांना मी भगवानांकडे गेले.
वसंता: स्वामी मला सर्व ऋषीमुनींचे आणि संतांचे दर्शन घडवा. मला त्यांच्या आशीर्वाद हवेत. संन्यास घेण्याअगोदर मला त्या सर्वांचे आशीर्वाद हवेत.
स्वामी: रडू नकोस. ये.
            आम्ही दोघं एका आश्रमात गेलो. मी आतमध्ये गेले. तो भारद्वाज ऋषींचा आश्रम होता. ते स्थान अत्यंत पवित्र व शांत होते. ऋषी बसून ग्रंथ वाचन करत होते. मी त्यांना वंदन केले व म्हणाले," कृपा करून मला आशीर्वाद द्या. मी संन्यास घेतेय. मला तुमच्या आशीर्वाद हवेत. त्यांनी मला आशीर्वाद दिले व म्हणाले," तुला सर्वांचे आशीर्वाद लाभतील." तेथून निघताना त्यांनी मला पुन्हा बोलावले व त्यांच्या कमंडलूतील पवित्र जल माझ्या अंगावर शिंपडत म्हणाले," कमंडलूतील ह्या जलाचे प्रोक्षण जणूकाही गंगेची शुद्धीकरण. तू सर्वांच्या कर्मांचा संहार करण्यासाठी येथे आली आहेस. तू पवित्र गंगा आहेस तुला मी का पवित्र करू?" त्यानंतर मी स्वामींकडे येऊन त्यांच्या पायावर लोळण घेतली व म्हणाले," हे प्रभू, स्वामी! तुमच्या कृपेने मला भारद्वाज ऋषींचे दर्शन झाले."
 
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम


रविवार, ८ जून, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

       " सत्याचा शोध घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे तप. या तपाद्वारे ज्ञान प्राप्त होते व ज्ञानातून परमानंदाची अनुभूती होते. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ५९
 
          इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात. परंतु त्याची विषयाबद्दलची आसक्ती राहतेच. परंतु स्थितप्रज्ञ पुरुषाची ही आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे कृष्णा जोपर्यंत तुझे दर्शन होत नाही तोपर्यंत एखाद्याच्या इच्छांचा लय होणे शक्य नाही असे दिसते. कृपा करून मला तुझे मंगल विश्वव्यापक रूप दाखव. आहाराच्या बाबतीत माझे माझ्या जिभेवर नियंत्रण राहू दे. इंद्रियसुखांमध्ये गुंतू न देता  इंद्रियातीत बनव. हे गुणातीता, सगुणा, निर्गुणा, निराकारा, तू माझी आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्. 
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, ५ जून, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

       " परमेश्वराप्रती असणारी अढळ श्रद्धा, परमेश्वराहून अधिक महान आणि सामर्थ्यशील आहे. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ५८
 
           ज्याप्रमाणे कासव आपले सर्व अवयव कवचामध्ये ओढून घेते त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना विषयांपासून सर्व प्रकारे आवरून घेतो त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          कान्हा! या यः कश्‍चित जीवाला कासवासारखे सर्व अवयव आत वळवायला लाव. याला स्थिरमती देऊन, त्यांच्याच सापळ्यात अडकवणाऱ्या इंद्रियांना अंतर्मुख व्हायला शिकव. इंद्रियनिग्रह करण्यासाठी याचे मन खंबीर बनव. हे पुरुषोत्तमा, पुंडरीकाक्षा, हे बुद्धदेवा, सर्वेश्वरा, हे लक्ष्मीपते, हे आदिपुरुषा, देवाधिदेवा, तू माझे आश्रयस्थान आहेस. मी तुझ्या चरणांशी शरणागत आहे. कृपया माझे रक्षण कर. शरणो शरणम्. 
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १ जून, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

       "तुमच्या मुखाने केवळ सत्य वदावे, अन्य काही नाही."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ५७
 
           जो पुरुष भौतिक जगातील शुभाशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही व त्याचा द्वेषही करत नाही तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थिर झालेला असतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे कान्हा, या क्षुद्र जीवाला सुखाने आनंदून जाऊ देऊ नकोस आणि दुःखाने हातांश होऊ देऊ नकोस. ज्ञानाने त्याची वृत्ती समतोल बनव. त्याला निरासक्त बनव. त्याला आवडनावडी पासून मुक्त कर. दीनदयाळा, निर्मला, निष्कलंका, नित्यानंदा, तू माझा आश्रयदाता आहेस. शरणो शरणम्. 
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम