गुरुवार, १९ जून, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

           " मनामध्ये कधीही न शमणारी आध्यात्मिक तृष्णा जागृत झाल्यास नरजन्माचे सार्थक होते."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ६२,६३ 
 
           विषयांची चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो. रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
           कान्हा! मी विषयांमध्ये गुरफटून जाऊन विषयासक्त होऊ नये यासाठी तू दक्ष रहा. आसक्तीतून इच्छा आणि इच्छेतून क्रोध निर्माण होऊ देऊ नकोस. वासुदेवा वैकुंठवासा वनमाला, मी तुझ्यापुढे नतमस्तक होतो. तू माझा निवारा आहेस. शरणो शरणम्. 
 
          कान्हा, मी क्रोधाने पूर्णपणे उध्वस्त झाल्यामुळे संभ्रमित झालो आहे. त्यामुळे माझी स्मरणशक्ती भ्रष्ट झाली आहे. विवेक बुद्धी नष्ट झाली आहे. आपदबंधवा, अनाथरक्षका, आदिनारायणा, हे आंडाळप्रिय श्रीरंगा, तू माझा आधार. स्वामी मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलो आहे. तुम्ही मला तुमच्या चरणांशी घेऊन जा. गोविंदा, मुकुंदा, तूच माझे आश्रयस्थान. शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा