ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" सत्याचा शोध घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे तप. या तपाद्वारे ज्ञान प्राप्त होते व ज्ञानातून परमानंदाची अनुभूती होते. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - २, श्लोक ५९
इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात. परंतु त्याची विषयाबद्दलची आसक्ती राहतेच. परंतु स्थितप्रज्ञ पुरुषाची ही आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
हे कृष्णा जोपर्यंत तुझे दर्शन होत नाही तोपर्यंत एखाद्याच्या इच्छांचा लय होणे शक्य नाही असे दिसते. कृपा करून मला तुझे मंगल विश्वव्यापक रूप दाखव. आहाराच्या बाबतीत माझे माझ्या जिभेवर नियंत्रण राहू दे. इंद्रियसुखांमध्ये गुंतू न देता इंद्रियातीत बनव. हे गुणातीता, सगुणा, निर्गुणा, निराकारा, तू माझी आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा