ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराप्रती असणारी अढळ श्रद्धा, परमेश्वराहून अधिक महान आणि सामर्थ्यशील आहे. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - २, श्लोक ५८
ज्याप्रमाणे कासव आपले सर्व अवयव कवचामध्ये ओढून घेते त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना विषयांपासून सर्व प्रकारे आवरून घेतो त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
कान्हा! या यः कश्चित जीवाला कासवासारखे सर्व अवयव आत वळवायला लाव. याला स्थिरमती देऊन, त्यांच्याच सापळ्यात अडकवणाऱ्या इंद्रियांना अंतर्मुख व्हायला शिकव. इंद्रियनिग्रह करण्यासाठी याचे मन खंबीर बनव. हे पुरुषोत्तमा, पुंडरीकाक्षा, हे बुद्धदेवा, सर्वेश्वरा, हे लक्ष्मीपते, हे आदिपुरुषा, देवाधिदेवा, तू माझे आश्रयस्थान आहेस. मी तुझ्या चरणांशी शरणागत आहे. कृपया माझे रक्षण कर. शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा