ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
प्रकरण - २
कुमारी पासून कुबेरापर्यंत
१८ जानेवारी २००१ सायं ध्यान
वसंता: स्वामी एस. व्ही. विचारत होते की तुम्ही आता भारद्वाज ऋषींना आणू शकता का?
स्वामी: मूर्ख आहे तो! मी माझ्या इच्छेने कोणालाही आणू शकतो. तुला आता जीझस् दाखवू का?
असे म्हणून स्वामींनी मला जीझस् दाखवले. आपण त्यांना चित्रात पाहतो तसेच ते होते. त्यांनी राखाडी रंगाची लांब कफनी घातली होती. त्यांच्या मुखावर दिव्य आभा दिसत होती. त्यांच्या दर्शनातून प्रेमाची अनुभूती होत होती. त्यांनी मला आशीर्वाद दिले. ते म्हणाले," सर्व धर्मांचे लोक तुझ्याकडे येतील.
वसंता: स्वामी! स्वामी! हे सत्य आहे का?
स्वामी: तू जे पाहतेस ते सर्व सत्य आहे. तू का रडतेस? भिऊ नकोस.
हे लिहिताना मला अॅडलेडमधील चर्चला भेट दिल्याची आठवण झाली. आम्ही तेथे ध्यानासाठी गेलो होतो. तेथील धर्मगुरू माझ्याशी बराच वेळ बोलले. ते म्हणाले," तुम्ही चर्चमध्ये प्रवेश करता क्षणीच मला तीव्र स्पंदने जाणवली. अॅडलेड व सिडनी येथून आलेल्या बऱ्याच लोकांना स्वामींविषयी जाणून घ्यायचे होते मी त्यांच्याशी बोलले.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा