ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" सत्याचा शोध घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे तप. या तपाद्वारे ज्ञान प्राप्त होते व ज्ञानातून परमानंदाची अनुभूती होते."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - २, श्लोक ६१
साधकाने सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून, चित्त स्थिर करून व माझ्यात तल्लीन होऊन ध्यानात बसावे. कारण ज्या पुरुषाचा इंद्रियांवर ताबा असतो त्याची बुद्धी स्थिर होते.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
हे कान्हा, सर्व इंद्रिये व्यवस्थित ताब्यात ठेवण्याचे सामर्थ्य मला दे. माझे हृदय आणि आत्मा तुझ्या ठिकाणी केंद्रित करून मला ध्यानाला बसव. मला स्थिरबुद्धी दे. निर्मल, निराकार, नित्यानंद, तूच माझा आश्रयदाता आहेस. शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा