मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

          " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १४ , श्लोक ७
 
           हे कौंतेया, रजोगुण इच्छा व आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज. तो या जीवात्म्याला सकाम कर्माशी बांधतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            कान्हा! मला राजोगुणांची लक्षणे सांग. हा अभिलाषेतून उत्पन्न होतो. माझ्या मधील रजोगुण तुझ्या दर्शनाच्या उत्कट इच्छेशी जोड. माझ्या आत्म्याला तुझ्या सेवेसाठी आसक्त कर. हे सुंदररूपा, कान्हा, कारुण्या तू माझा आसरा आहेस. हे प्रभू ! जीवन जगण्यासाठी तू मला मार्गदर्शन कर. मला तुझी प्राप्ती होऊ दे. मृत्यूसमयी माझ्या मनात तुझेच विचार असू देत. मला केवळ तुझेच कार्य करू देत.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

 

 

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

          " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १४ , श्लोक  ६
 
           हे निष्पाप अर्जुना! या तीन गुणांपैकी सत्त्वगुण निर्मळ आणि तेजोमय आहे. जो सत्त्वगुणामध्ये स्थित आहे ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            कान्हा, या क्षुद्राला सत्वगुण बहाल कर. हे दयानिधे, हे परम पावना, मला ज्ञानी बनव. मला व्याधीमुक्त आणि पापमुक्त कर. याला फक्त तुझी भक्ती करून सत्त्वामध्ये स्थित राहू दे. आनंद आणि ज्ञान यासंबंधी आसक्ती निर्माण करून त्याला सत्त्वगुणांवर नियंत्रण ठेवण्यास शिकव. त्याला फक्त तुझीच कार्य करू दे. हे परमेश्वरा, तू माझा नाथ आहेस. शरणो शरणम्.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

 


बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
२२ जानेवारी २००१ प्रातः ध्यान.
           भगवान आले आणि आम्ही दोघं ज्या ठिकाणी गेलो तेथे मला संत ज्ञानेश्वरांचे दर्शन झाले. मी त्यांच्याकडे आशीर्वाद मागितले. माझ्या मस्तकावर हात ठेवत ते म्हणाले, प्रेम ध्यान स्वरूप देवी म्हणून तुझी भक्ती केली जाईल.
           दुपारी ४ वाजताचे ध्यान
           स्वामी मला कुबेर पटनमला नेले. परमेश्वराचे धन भांडार मी स्वामींना म्हणाले," मला येथे येण्याची इच्छा नव्हती. चला आपण येथून जाऊ या." स्वामी म्हणाले," शांत रहा आणि ये." तेथे कुबेर व इतर काही जण होते. स्वामींनी कुबेरांना सांगितले," ही महालक्ष्मी आहे तिला ते माहीत नसल्यामुळे ती तुझ्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे." कुबेराने दोन पैशांची मोठी बंडले आणली आणि माझ्या पायांवर ठेवली. वंदन करून ते म्हणाले," मी संगविधी आणि पद्मनिधी( सर्वोच्च मूल्य असलेल्या दोन धनसंपदा) दोन्ही तुमच्या चरणी समर्पित करतो." जे घडत होते त्यातले मला काही समजत नव्हते. आम्ही तेथून निघालो.

स्वामी: तू महालक्ष्मी आहेस. धनाची देवता. सर्व संपदा तुझ्या चरणांशी आहेत.
वसंता: का स्वामी? मला तुमच्या शिवाय कोणतीही संपदा नकोय.
स्वामी: मी तुझ्यासाठी थोडीच आहे? तुला सेवा कार्यासाठी उपयोगी पडेल.
परंतु मला आशा भेटी नको होत्या मी विलाप करत होते.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

 

 

 

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

 

         सर्वांना सप्रेम साई राम मंगलमय नवरात्रीनिमित्त आपण दररोज ९ दिवस श्री वसंत साईंचा एक दिव्य विचार ब्लॉगवर पोस्ट करणार आहोत. 

******************************************

 


 जय साईराम

रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

          " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १४ , श्लोक    
 
           हे महाबाहो, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृती पासून उत्पन्न झालेली तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            कान्हा, या नीच, बावळ्या, देहीला सज्ञान कर. सत्व, रजो आणि तमो गुणांच्या सापळ्यात त्याला अडकू देऊ नकोस. हे प्रकृती मधून जन्माला आले आहेत, याची मला जाण करून दे. हे प्रभू, पुरुष प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या परब्रम्हा, परमधामा, भक्तरक्षका, या पाप्याला तुझ्या चरण कमलांशी घे. मृत्युसमयी तुझे विचार येतील असे विचार दे. तू माझा आश्रय. शरणो शरणम्.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

          " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  ३२  
 
           ज्याप्रमाणे सर्वव्याप्त आकाश सूक्ष्म असल्याकारणाने लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्यामुळे देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            हे कान्हा, गरुडवाहना, कौस्तुभाभरणा, या क्षुद्रातल्या क्षुद्र जीवावर तू तुझ्या कृपेचा वर्षाव कर. ज्याप्रमाणे सर्वव्याप्त आकाश तरलतेमुळे लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहव्याप्त निर्गुण आत्मा देहगुणांनी लिप्त होत नाही. हे या मूढाच्या डोक्यात शिरू दे. रामानुजा, हे प्रभू, सप्तगिरीवासा, शरणो शरणम्.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

 

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

          " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  ३१  
 
          हे कौंतेया, हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही तो काही करत नाही आणि लिफ्ट होत आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            हे कान्हा, तू परमात्मा आहेस. तुला ना आदी ना अंत. तू निर्गुण आहेस, अविनाशी आहेस. तू देहधारी असूनही अनासकता आहेस. अकर्मा आहेस. ह्या दिनाला त्याचा बोध करून दे. तू जे सांगतोस त्यावर माझा पूर्ण विश्वास बसू दे. नारायणा, या नराचा नारायण बनव. तू नादब्रह्म आहेस. या फाटक्या माणसाला तू पूर्ण बनव. मला सतत तुझी नामस्मरण करण्याची बुद्धी दे. हे जगदीशा, व्यंकटेशा, श्रीनिवासा  तूच माझे आश्रयस्थान. शरणो शरणम्.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

 " प्रत्येकाचा स्वतःचा व्यक्तिगत स्वभाव असतो व त्यानुसार भक्तिचे रूप आणि पद्धत बदलते. "

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  ३०  
 
          जो पुरुष भौतिक प्रकृतीच्या संपर्कामुळेच जिवात्म्याला निरनिराळे देह प्राप्त होत  असल्याचे आणि प्रकृतीतूनच सर्व भूतांचा विस्तार होत असल्याचे जाणतो तो ब्रम्हाला प्राप्त होतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            कान्हा! तू माझा आधार, विविध  प्रकारच्या जीवभूतांचा तूच एक आधार आहेस, त्याचा मला तू बोध करून दे. बुद्धिमंतांची बुद्धी तू आहेस. आनंदा! अच्युता! हरितवर्णा वेणुगान विश्वरूपा! विदुराच्या घरच्या कण्या तू जेवलास. तुला जेवण घालण्याइतका मला उत्तम बनव. कान्हा, शरणो शरणम्.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            इंद्रांनी व इतर स्वर्गीयजनांनी माझ्या तपामध्ये अडथळे आणू नये ह्यासाठी स्वामींनी त्यांना मला आशीर्वाद देण्यास सांगितले. या प्रसंगाने मी आश्चर्यचकित झाले. हे लिहिताना मला अजून एका प्रसंगाची आठवण झाली.
 
           महाभारतातील युद्धामध्ये, भीष्मांनी अर्जुनाचा पराभव करण्याची प्रतिज्ञा केली. कसेही करून भीष्म अर्जुनाचा वध करतील याची सर्वांना चिंता वाटत होती. काय करावे हे कोणालाही समजत नव्हते. त्यावेळी रात्री कृष्णाने अर्जुनाची पत्नी द्रौपदी हिला बरोबर घेऊन भीष्मांच्या तंबूत नेले. तिला तिची पादत्राणे तंबूच्या बाहेर काढून ठेवण्यास सांगून त्यांनी ती आपल्या हातात घेतली. त्यानंतर पदराने मुख झाकून घेऊन भीष्मांच्या पायांशी गुडघ्यावर बसण्यास सांगितले. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे द्रौपदी भीष्मांच्या चरणांपाशी जाऊन बसली. त्यांनी तिला 'अखंड सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद दिला. भीष्मांनी अर्जुनाचा वध करणे शक्य होऊ नये यासाठी कृष्णाने ही क्लूप्ती योजली असल्याचे नंतर भीष्मांना समजले. परमेश्वर त्याच्या भक्तांसाठी काय करणार नाही? एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांची पादत्राणेही वाहिली.
 
              त्याचप्रमाणे माझ्या तपामध्ये इंद्र व इतर देवदेवतांकडून अडथळे येऊ नये म्हणून हे श्री साई कृष्ण, इंद्र व इतर देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी मला त्यांच्याकडे घेऊन गेले. परमेश्वराच्या उपस्थितीत माझे तप पूर्ण होईल यात काही शंकाच नाही.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

रविवार, ७ सप्टेंबर, २०२५


   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

 " अळीपासून ब्रह्मपर्यंत सर्वांमध्ये परमेश्वराचे प्रतिबिंब पाहा."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  २९  
 
          जो पुरुष सर्व कर्म प्रकृतीकडूनच केली जातात असे पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे असे पाहतो, तोच यथार्थ रूपाने पाहतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            कान्हा ! या जगाचे रहाटगाडगे निसर्गतः चालू असते, हे या मूढाला दाखवून देऊन हा कर्ता नाही याची जाणीव करून दे. सत्यदर्शी बनव. तीन पावलात विश्व व्यापणाऱ्या वामना, लोणी खाऊन यशोदेस मुखामध्ये विश्व दर्शवणाऱ्या! गोवर्धन गिरीचे छत्र धरणाऱ्या ! तुझ्याशिवाय  निराधार आहे. प्रभू ! शरणो शरणम्.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५


   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

 " त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  २८ 
 
         जो पुरुष सर्व जीवांमध्ये  परमात्म्याला समरूपाने स्थित असल्याचे पाहतो तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            हे कान्हा, तू सर्वत्र सारखा भरून राहिला आहेस. हे पाहण्यासाठी मला ज्ञानचक्षू दे. हे नारायणा, या जीवाला आत्मघात करू देऊ नकोस. हे करुणाघ,ना मोक्ष प्राप्तीसाठी मला धर्मोपदेश कर. पद्मनाभा, परमेशा, पुरुषोत्तम, पुंडलिकाक्षा, अन्यथा शरणम नास्ति, त्वमेव शरणम् मम. 
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम