ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १४ , श्लोक ७
हे कौंतेया, रजोगुण इच्छा व आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज. तो या जीवात्म्याला सकाम कर्माशी बांधतो.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
कान्हा! मला राजोगुणांची लक्षणे सांग. हा अभिलाषेतून उत्पन्न होतो. माझ्या मधील रजोगुण तुझ्या दर्शनाच्या उत्कट इच्छेशी जोड. माझ्या आत्म्याला तुझ्या सेवेसाठी आसक्त कर. हे सुंदररूपा, कान्हा, कारुण्या तू माझा आसरा आहेस. हे प्रभू ! जीवन जगण्यासाठी तू मला मार्गदर्शन कर. मला तुझी प्राप्ती होऊ दे. मृत्यूसमयी माझ्या मनात तुझेच विचार असू देत. मला केवळ तुझेच कार्य करू देत.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा